मौजा सोनापूर तालुका चामोर्शी तालुकास्तरीय भव्य युवा क्रीडा स्पर्धेचे बक्षीस वितरण कार्यक्रम

मौजा सोनापूर तालुका चामोर्शी तालुकास्तरीय भव्य युवा क्रीडा स्पर्धेचे बक्षीस वितरण कार्यक्रम
चामोर्शी,
नेहरू युवा केंद्र गडचिरोली (युवा कार्यक्रम खेळ मंत्रालय भारत सरकार) तथा बिरसा मुंडा युवा मंडळ सोनापूर यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय भव्य युवा क्रीडा स्पर्धेचे बक्षीस वितरण कार्यक्रम या कार्यक्रमाचे अध्यक्ष  मधुकर केशवराव भांडेकर भाजपा युवा मोर्चा जिल्हा महामंत्री  यांच्या उपस्थितीत
            प्रमुख उपस्थिती  शेषराव  कोहळे उपसरपंच सोनापूर,  सुभाष कोठारे ग्रा.प. सदस्य आमगाव  लक्ष्मण वासेकर आमगाव    कुनघाडकर माजी सरपंच सोनापूर,  श्रावण दुधबावरे माजी सरपंच  राम बारसागडे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती सोनापूर लोकेश सोमनकर नेहरू युवा केंद्र चामोर्शी प्रमुख गावातील प्रतिष्ठित नागरिक व मोठ्या संख्येने युवा खेळाडू उपस्थित होते.
 *संताजी क्रीडांगण मौजा सोनापूर येते बक्षीस वितरणाचा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमात सांघिक खेळ खो-खो ,कबड्डी, वॉलीबॉल रस्सीखेच ,व्यक्ती खेळ गोळा फेक, लांब उडी , रिले या खेळाचा आयोजन करण्यात आले होते. परिसरातील युवा खेळाडूंनी सहभाग घेऊन या  खेळाडूंनी आपल्या खेळाचा कौशल्य दाखवून प्रथम ,द्वितीय ,तृतीय व वैयक्तिक अशा प्रकारे पारितोषिक प्राप्त केले. युवा खेळाडूंनी नेहरू युवा केंद्र गडचिरोली तथा बिरसा मुंडा युवा मंडळ सोनापूर यांचे आभार मानले.

Post a Comment

0 Comments