केंद्र व राज्य सरकारच्या जनकल्याणकारी योजना जनतेपर्यंत पोहचवा:-इंजि.प्रमोदजी पिपरे
भाजपा जिल्हा विस्तृत कार्यकारिणी बैठक संपन्न.
गडचिरोली:
आगामी विधानसभा,स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत विजय प्राप्त करायचे असेल प्रत्येक बुथावर, प्रत्येक गावा-गावात,प्रत्येक नागरिकांपर्यंत केंद्र व राज्यातील महायुतीच्या सरकारच्या जनकल्याणकारी योजना मुख्यमंत्री लाडकी बहीण,मुख्यमंत्री लाडका भाऊ,मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र योजना, विध्यार्थीनीना मोफत शिक्षण यासारख्या योजना जनतेपर्यंत पोहचवून या योजनांचा लाभ नागरिकांना मिळवून द्या. असे प्रतिपादन भाजपा लोकसभा समन्वयक इंजि. प्रमोदजी पिपरे यांनी केले.
भारतीय जनता पार्टी जिल्हा गडचिरोलीची जिल्हा विस्तारित कार्यकारिणी बैठकीचे आयोजन चामोर्शी रोडवरील फंक्शन हॉल मध्ये केले होते.यावेळी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
यावेळी विदर्भ संघटन मंत्री डॉ. उपेंद्रजी कोठेकर, विधानपरिषद आमदार प्रविनजी दटके,जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे,माजी खासदार अशोकजी नेते,आमदार डॉ. देवरावजी होळी, आमदार कृष्णाजी गजभे,जेष्ठ नेते तथा सहकार महर्षि अरविंद सावकार पोरेड्डीवार,जेष्ठ नेते बाबुरावजी कोहळे,लोकसभा संयोजक किसनजी नागदेवे,किसान आघाडी प्रदेश सचिव रमेशजी भुरसे,रविंद्रजी ओल्लारवार,डॉ.मिलींद नरोटे यांनी सुद्धा मार्गदर्शन केले.
यावेळी मंचावर जेष्ट नेते प्रकाश सावकार पोरेड्डीवार,डॉ. चंदाताई कोडवते,जिल्हा महामंत्री गोविंद सारडा,सदानंद कुथे, शहर अध्यक्ष मुक्तेश्वर काटवे सर्व जिल्हा आघाडीचे अध्यक्ष,महामंत्री,सर्व तालुका अध्यक्ष महामंत्री,भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा महामंत्री तथा माजी नगराध्यक्ष सौ. योगीताताई पिपरे व जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम यांनी केले व कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.
0 Comments