कुरुड येथे आमदार कृष्णा गजबे यांच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत सी.सी. रोड बांधकामाचे भूमिपूजन संपन्न

कुरुड येथे आमदार कृष्णा गजबे यांच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत सी.सी. रोड बांधकामाचे भूमिपूजन संपन्न



देसाईगंज:- देसाईगंज तालुक्यातील मौजा कुरुड  येथे आमदार कृष्णा गजबे यांच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत आय. डी.बी. आय बँक ते सौ. रेखा मडावी यांच्या घरापर्यंत सि.सि.रोड बांधकाम करणे. (अंदा.१० लक्ष रू.) या कामाचे भूमिपूजन आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांनी जागेची विधिवत पूजा करुन, नारळ फोडून, कुदळ मारुन  भूमिपूजनाचे शुभारंभ करण्यात आले.

यावेळी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे, उपसरपंच ‌क्षितीज उके, सदस्य शंकर पारधी, सदस्य विलास पिलारे, सदस्य पलटुदास मडावी, सदस्य रेखाताई मडावी, सदस्य प्रतिमा उके, दौलत ठाकरे, नामदेव मिसार, गंगाधर खोब्रागडे, खापरे पाटील साहेब, जनार्दन नंदनवार, अतुल फंटिग व गावकरी मंडळी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments