चकमकीत जखमी जवानांना आणण्यासाठी लॉयड मेटल्सच्या हेलिकॉप्टरचा आधार!

चकमकीत जखमी जवानांना आणण्यासाठी लॉयड मेटल्सच्या हेलिकॉप्टरचा आधार!



गडचिरोली,
गडचिरोली महाराष्ट्र- छत्तीसगड सीमेवर वांडोली गावाजवळ टिपागड व चातगाव दलमच्या १२ नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात पोलिसांना यश आले असून या चकमकीदरम्यान जखमी झालेल्या एक पोलीस उपनिरीक्षक व दोन पोलीस जवानांना घटनास्थळावरून नागपूर येथे उपचारासाठी नेण्याकरिता लॉयड मेटल्स व एनर्जी लिमिटेडच्या हेलिकॉप्टरचा मोठा आधार झाला असल्याची माहिती आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड परिसरात लोह उत्खनन करून चामोर्शी तालुक्यात कोणते येथे कोट्यवधी रुपयाचा उद्योग उभारण्यासाठी लॉयड मेटल्स अॅण्ड एनर्जी लिमिटेडने पुढाकार घेतला आहे. जिल्ह्यातील माओवाद्यांशी लढताना अनेक वेळा पोलिसांना हेलिकॅप्टरची मदत वेळेवर मिळणे आवश्यक असते. यासाठी राज्य शासनाने गडचिरोली पोलिसांना एक हेलिकॉप्टर याआधी दिले होते. मात्र प्रतिकूल परिस्थितीत अनेकदा पोलीस जखमी झाल्यानंतर त्यांना नागपूरला नेण्यासाठी दुसऱ्याही हेलिकॉपटरची

आवश्यकता होती, ही गरज लक्षात घेऊन लॉयड मेटल्स आणि एनर्जी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक बी प्रभाकरन यांनी जिल्हा पोलीस प्रशासनाला आपल्या कंपनीमार्फत एक हेलिकॉप्टर गेल्या तीन-चार वर्षापासून दिले आहे.

या हेलिकॉप्टरचा उपयोग पोलिसांना मोठ्या प्रमाणात होत आहे. नुकताच झालेल्या चकमकीतही गडचिरोली पोलीस दलाचे पोलीस उपनिरीक्षक सतीश पाटील, पोलीस जवान शंकर पोटावी व विवेक शिंगोडे हे तीघे जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी तातडीने नागपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर पुढील उपचार सुरू आहे. या कामात लॉयड मेटल्सच्या हेलिकॉप्टरचा मोठा आधार मिळाला असल्याची माहिती कंपनीच्या प्रवक्त्याने दिली आहे.

Post a Comment

0 Comments