गडचिरोली तालुक्यातील पारडी चलो पंचायत चलो वार्ड अभियान कार्यक्रम - युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव ऍड.विश्वजित कोवासे यांच्या नेतृत्त्वात


भारतीय राष्ट्रीय युवक काँग्रेसचे सचिव तथा विदर्भ झोन चे प्रभारी सय्यद अहमद खालीज यांची प्रमूख उपस्थिती




गडचिरोली,
काँग्रसच्या चलो पंचायत चलो वार्ड मोहिमेअंतर्गत गावागावात जाऊन काँग्रेसची ध्येयधोरणे शेवटच्या माणसापर्यंत पोहोचविण्यासाठी, कार्यकर्त्यांना संघटित करण्यासाठीं व पक्षबळकटीकरणासाठी चलो पंचायत चलो वार्ड हे अभियान राबविण्यात येत आहे.गडचिरोली जिल्हयात प्रदेश काँग्रेसचे सचिव ऍड विश्वजित कोवासे यांच्या नेतृत्वाखाली या अभियानाला उस्फुर्त प्रतिसाद मिळत असून दिनांक 18 जुलै गुरुवारी गडचिरोली तालुक्यातील पारडी येथे भारतीय राष्ट्रीय युवक काँग्रेसचे सचिव तथा विदर्भ झोन चे प्रभारी सय्यद अहमद अजीज यांचे अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न झाला यावेळी सय्यद अहमद खालीज यांनी काँग्रसचे ध्येयधोरणे ही शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार, नोकरदार या सर्वाचे कल्याण साधणारी असून काँगेस च्या बळकटीकरणासाठी सर्वांनी एकत्रित येवून कार्य करण्याची गरज असल्याचे मनोगत व्यक्त केले.तर ऍड विश्वजीत कोवासे यांनी गावागावात येणाऱ्या समस्या जाणून घेऊन त्या कशा सोडविता येईल हा या अभियानाचा उद्देश असून नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी गडचिरोली युवक काँगेस कटिबध्द असल्याचे सांगितले.

यावेळी पारडी गावातली काँगेस कार्यकर्त्यांसह नागरिकांची मोठया संख्येने उपस्थिती होती. यावेळी नागरिकांनी गावातली रस्ते , नाली तसेच ईतर समस्या मांडल्या.

या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून महाराष्ट्र युवक काँग्रेसचे सचिव अतुल मल्लेलवार , ज्योतिष होनहल्ली सोशल मीडिया इन्चार्ज कर्नाटक, आकाश भाटिया, आसिफ शेख , युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष नितेश राठोड ,
यावेळी उपस्थित पारडी ग्राम पंचायत चे उपसरपंच तथा कार्यक्रमाचे आयोजक घनश्याम मुरवतकर, विवेक घोंगडे, चारुदत्त पोहाणे, संजय चन्ने सोशल मीडिया जिल्हा अध्यक्ष, संतोष बारसिंगे , गौरव येनप्रेडीवार, कुणाल ताजने, अभिजीत घाईत, जावेद शेख, सर्वेश पोपट, प्रतिक बारसिंगे, आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments