विविध उपक्रमांनी प्रकाश सा. पोरेड्डीवार यांचा वाढदिवस उत्साहात

विविध उपक्रमांनी प्रकाश सा. पोरेड्डीवार यांचा वाढदिवस उत्साहात

विद्यार्थ्यांना नोटबुकाचे वितरण - आ. कृष्णा गजबे

 वाढदिवसानिमित्य वृक्षारोपण, ताडपत्री,रेनकोट,मोठया छत्र्या.



आरमोरी:- 
भारतीय जनता पार्टी तालुका आरमोरी, भा.ज. यु. मो. तालुका आरमोरी, युवामंच व मित्र मंडळ आरमोरी यांच्या संयुक्त विद्यमाने गडचिरोली नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा सहकार नेते प्रकाश सा. पोरेड्डीवार यांचा वाढदिवस आज विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. प्रकाशभाऊंच्या वाढदिवसा प्रित्यर्थ हितकारीणी विद्यालयातील विद्यार्थ्यांना तसेच जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना नोटबुकाचे वितरण, आ. कृष्णा गजबे, भाजपचे जिल्हा सरचिटणीस नंदू पेट्टेवार,भाजपचे आरमोरी तालुकाध्यक्ष पंकज खरवडे,माजी नगराध्यक्ष पवन नारनवरे, माजी आरोग्य सभापती भारत बावनथडे, माजी पाणीपुरवठा सभापती विलास पारधी व भाजप कार्यकर्त्यांचे हस्ते वितरित करण्यात आले.
   तसेच युवामंचच्या वतीने आरमोरी येथील मच्ची मार्केट मध्ये विविध वृक्षांच्या प्रजातीचे वृक्षारोपण करण्यात आले.तसेच अतिवृष्टीने घर पडलेल्या क्षतीग्रस्त गरजवंत्यांना ताडपत्रीचे वितरण आ.कृष्णा गजबे यांच्या हस्ते करण्यात आले.अहोरात्र कष्ट करणाऱ्या आरमोरी शहरातील हमाल बांधवांना भाजप कार्यकर्ते व युवामंचच्या वतीने रेनकोटचे  वितरण करण्यात आले.तसेच आरमोरी येथील  उघड्यावर बसणाऱ्या छोटे व्यावसायिक फुटपाथ दुकानदारांना मोठ्या छत्रीचे वाटप करण्यात आले.समाजाशी आपले  काही देने आहेत हे अंगाशी बाळगून  कार्यकर्त्यांनी मा.प्रकाश सावकार पोरेड्डीवार यांचा वाढदिवस मोठ्या थाटात साजरा केला.
  .वाढदिवसाप्रीत्यर्थ प्रकाश भाऊंना  सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या पक्षाच्याच नव्हेतर सर्व पक्षीयांनी ट्विटर, व्हाट्स अँप,फेसबुक, इंस्टाग्राम यावर त्यांच्या हजारो चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या. तसेच जिल्ह्यातील असंख्य कार्यकर्त्यांनी तसेच त्यांच्या चाहत्यांनी प्रकाशभाऊंच्या  निवासस्थानी जाऊन त्यांना पुष्पगुच्छ देऊन सदिच्छा भेट घेतली. 
प्रकाश सावकार पोरेड्डीवार  यांच्या वाढदिवसानिमित्य  वृक्षारोपण,  ताडपत्री,रेनकोट,छत्र्या, व नोटबुक वितरीत करताना आ.कृष्णा गजबे,माजी नगराध्यक्ष पवन नारनवरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ईश्वर पासेवार, उपसभापती व्यंकटी नागीलवार, श्रीहरी कोपुलवार, भाजपा  जिल्हा सरचिटणीस नंदू पेट्टेवार,  भाजपाचे तालुकाध्यक्ष पंकज खरवडे, प्राचार्य तेजराव बोरकर,डाँ.दुर्वेश भोयर,आरमोरी नगरपरिषदेचे माजी आरोग्य सभापती भारत बावनथडे, माजी पाणीपुरवठा सभापती विलास पारधी, माजी महिला व बालकल्याण सभापती सुनिता चांदेवार, माजी नगरसेविका गीता सेलोकर,  बी. टी. सेलोकर,सुनिता मने, प्रगती नारनवरे, सुशील पोरेड्डीवार, नंदू नाकतोडे,संगीता राऊत,  भाजयुमो तालुकाध्यक्ष गोविंदा भोयर ,सभापती मनोज मने,उपसभापती दीपक निंबेकर, युगल सामृतवार, स्वप्नील धात्रक, अमोल खेडकर, सुरज कारकुरवार, मंगेश चापळे, प्रसाद साळवे, विवेक रोडगे,  कृणाल पिल्लारे,जितेंद्र ठाकरे,आशुतोष चव्हाण, प्रसाद साळवे, महेश बांते, अक्षय हेमके, रेवती मने, जितेंद्र ठाकरे,  श्रीकांत नागीलवार, उल्हास देशमुख ,राहुल गिरडकर, राहुल तितरमारे, अमिश निमजे, महेश बुल्ले, शुभम निंबेकर, अमित राठोड,श्रीनिवास आंबटवार, टिंकू बोडे,थामेश्वर मैनंद, गणेश बैरवार, चंदू आकरे, बालू मने, संजय सोनटक्के, चंदू वादीकर, मडावी सर  नितीन बनसोड तसेच युवामंचचे सदस्य,भाजपा,भाजयुमोचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments