प्रभाग ०७ मध्ये विकासाची नवी पहाट - सौ. खुशबूताई मंगेश रणदिवे यांचा जनतेच्या विश्वासाला उत्स्फूर्त प्रतिसाद
गडचिरोली:
गडचिरोली शहरातील प्रभाग क्रमांक ०७ मध्ये जनतेच्या मूलभूत हक्कांसाठी लढणाऱ्या, विकासाची नवी दिशा दाखवणाऱ्या भाजप च्या उमेदवार सौ. खुशबूताई मंगेश रणदिवे यांच्या प्रचाराला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. प्रभागातील समस्या समजून घेणे, त्यासाठी तातडीची उपाययोजना सुचवणे आणि त्या प्रत्यक्षात राबवण्याची त्यांची तयारी यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.
सौ. रणदिवे यांनी दीर्घकाळ सामाजिक कार्यातून उभा केलेला जनसंपर्क आणि सर्व समाजघटकांशी जुळवलेले नाते याचा प्रचारादरम्यान चांगलाच परिणाम दिसून येत आहे. स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्त्यांची सुधारणा, महिलांसाठी सुरक्षित वातावरण आणि युवकांसाठी रोजगाराच्या संधी अशा अनेक विषयांवर त्यांनी स्पष्ट व ठोस भूमिका मांडली आहे.
प्रभागातील नागरिकांनीही "काम करणारी आणि थेट लोकांशी संपर्क ठेवणारी नेतृत्त्वशैली ही काळाची गरज आहे, आणि सौ. खुशबूताई रणदिवे या त्या अपेक्षांवर उतरतात" असे मत व्यक्त केले आहे त्यांच्या कामातील पावती म्हणून शहरात त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली आहे.

0 Comments