दैनिक , साप्ताहीक , पोर्टल वृत्तपत्राच्या मागण्या शासनाने पुर्ण कराव्यात. व्हॉईस ऑफ मिडिया तर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवशीय उपोषण.

दैनिक , साप्ताहीक , पोर्टल वृत्तपत्राच्या मागण्या शासनाने पुर्ण कराव्यात. व्हॉईस ऑफ मिडिया तर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवशीय उपोषण. 



गडचिरोली - दैनिक ,साप्ताहिक वृत्तपत्र शासनाच्या बातम्या शेवटच्या घटकापर्यंत जाऊन पोहोचणारा दुवा म्हणून काम करतो. तरी शासनाच्या अभियान , उपक्रमाच्या जाहीरातमधे साप्ताहिकांना डावलण्यात येतो. म्हणून व्हॉईस ऑफ मिडियाच्या वतीने संपूर्ण देशभरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवशीय उपोषण करण्यात आले व आपल्या मागण्याचे निवेदन जिल्हाधिकारी मार्फत शासनाला पाठविण्यात आले. विधानसभा निवडणुकीत सणवार उत्सव काळात दैनिक , साप्ताहिक , न्युज पोर्टल , युट्युब चॅनलला जाहीरात देण्यात यावे. (2) आर ' एन , आय कडून नविन नियमानुसार लादण्यात आलेल्या जाचक अटी रद्द करण्यात याव्या. (3) २५ वर्ष पुर्ण झालेल्या साप्ताहिकास तपासणीतुन वगळण्यात यावे. ( ४ ) टिआरपी ची जिवघेणी स्पर्धा बंद करण्यात याव्यात . ( ५ ) पत्रकाराकरीता अधिस्वीकृती कमिटी संदर्भामधे जुना जि. आर. रद्द करण्यात यावा. ( ६ ) जे न्युज पोर्टल , युट्युब चॅनल , लोकाभिमुख अधिक लोकापर्यंत पोहचलेले आहेत त्यांना शासनाच्या यादिवर घेण्यात यावे ( ७) पत्रकारांची सेवानिवृत्ती योजनेमधे वाढ करण्यात यावे. अश्या विविध मागण्या घेऊन जिल्हाधिकारी .कार्यालय गडचिरोली समोर एक दिवशीय उपोषण करण्यात आले. उपोषणाला व्हॉईस ऑफ मिडियाचे जिल्हाध्यक्ष व्यंकटेश दुडमवार , राज्य सहसंघटक संजय तिपाले , राज्य कार्यकारणी सदस्य मुकुंदभाई जोशी , सुमीत पाकलवार , रेखाताई वंजारी , संगीता विजयकर , बबन वडेट्टिवार , जेष्ठ पत्रकार कांतीभाई सुचक , प्रा. मुनिश्वर बोरकर ,नितिन ठाकरे, संदिप कांबळे , दिपक सुनतकर , अनुप मेश्राम , सुरेश पद्दशाली , रितेश वासनिक , मुकेश गेडाम , क्रिष्णा वाघाडे , जगदिश कन्नाके ' सुमीत पाकलवार , आदि सहीत दैनिक ' साप्ताहिक , न्युज पोर्टल , युट्युब चे पत्रकार बहुसंख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments