गडचिरोली तहसील कार्यालयाला मिळणार नवीन इमारत
बांधकामासाठी १७ कोटी ९४ लाख रूपये मंजूर, आ. डॉ. होळी यांच्या प्रयत्नांना यश
गडचिरोली ,
आ.डॉ. देवराव होळी यांनी पाठपुराव्यामुळे केलेल्या गडचिरोली जिल्हा मुख्यालयी असलेल्या गडचिरोली तहसील कार्यालयाच्या नवीन इमारत बांधकामाचा मार्ग मोकळा झला असून शासनानेनवीन प्रशासकीय इमारत बांधकामाला मंजूरी दिली असून बांधकामासाठी १७ कोटी ९४ लाख ८३ हजाराचा निधी मंजूर केला आहे.
गडचिरोली तहसील कार्यालय निर्मितीपासून जुन्या इमारती मध्ये सुरू आहे. कार्यालयाच्च्या कामकाज लक्षात घेता इमारत तोकडी पडत आहे. तसेच तहसील कार्यालयात सोयीसुविधांचा अभाव आहे. शासकीय कामाासाठी आलेल्या तालुक्यातील नागरिकांना उन पावसात इतरत्र आडोसा घ्यावा लागतो. सदर बाब लक्षात घेता नवीन प्रशाकीय इमारतीसाठी निधी
येथे उपलब्ध करून देण्याची मागणी आ. जिल्हा डॉ. देवराव होळी यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व महसूल मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांचेकडे केली होती. या मागणाची दखल घेवुन गडचिरोली येथे नवीन तहसील कार्यालयाच्या इमारत बांधकामाला प्रशासकीय मंजूर प्रदान करण्यात आली आहे. त्याबद्दल आ.डॉ. होळी यांनी शासनाचे आभार मानले आहे
0 Comments