गडचिरोली पोलिसांनी केला गडचिरोली-छत्तीसगड सीमेवरिल माओवादी कॅम्पचा पर्दाफाश           


गडचिरोली पोलिसांनी केला गडचिरोली-छत्तीसगड सीमेवरिल माओवादी कॅम्पचा पर्दाफाश

गडचिरोली,
काल दिनांक 06/06/2024 रोज गुरुवारी एक विश्वासार्ह माहिती मिळाली की, कसनसूर - चातगाव, टिपागड, दलम, छत्तीसगडच्या मोहल्ला मानपूर दलम आणि औंधी दलमचे काही सशस्त्र माओवादी हे मौजा भिमनखोजी, नारकसा (पोस्टे गॅरापत्ती पासून 04 किमी उत्तरेला) जंगल परिसरात घातपात घडविण्याच्या उद्देशाने एकत्रित जमुन तळ ठोकून आहेत.  सदर गोपनिय माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. नीलोत्पल यांच्या आदेशाने माओवादविरोधी अभियानाची योजना आखण्यात आली.

यावरून अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. कुमार चिंता यांच्या नेतृत्वाखाली विशेष अभियान पथक, गडचिरोली व पोस्टे गॅरापत्ती तसेच सीआरपीएफ 113 बटा. अ कंपनीच्या जवानांनी सदर जंगल परिसरात लगेच माओवादविरोधी अभियान राबविण्यात आले. मौजा भिमनखोजी जंगल परिसरात शोध मोहिम राबवित़ पुढे जात असतांना, अंदाजे 15.00 वा. चे दरम्यान माओवाद विरोधी अभियान पथकातील पहिल्या ग्रुपमधील जवानांना माओवाद्यांचा कॅम्प दिसून आला. सदर कॅम्पच्या दिशेने सुरक्षिततेची काळजी घेत पुढे जात असतांना पोलीस पार्टी आल्याचा सुगावा लागल्याने माओवाद्यांनी कॅम्पमधील सर्व साहित्य सोडुन पहाडी व घनदाट जंगलाचा फायदा घेत अगोदरच पळ काढला.

माओवाद्यांच्या कॅम्पच्या ठिकाणी जाऊन शोध अभियान राबविले असता, सदर ठिकाणावरुन सोलार प्लेट 01 नग, माओवादी डांगरी (पँट) 02 नग, माओवादी पिट्टु 06 नग, चप्पल जोड 03 नग, ताडपत्री 03 नग, प्लॅस्टीक टेंट 02 नग, बेल्ट 07 नग, टेस्टर 02 नग, लाकडी मुठ असलेला पेचकस 01 नग, शॉल 02 नग, लंुंगी 01 नग,  शर्ट (फुल) 04 नग, टी शर्ट 06 नग, लोअर पँट 02 नग, जॅकेट (हिरवा) 01 नग, दुपट्टे (हिरवे व लाल) प्रत्येकी 01 नग, कॅप 02 नग, बेडशिट 01 नग, मग (स्टिल) 04 नग, प्लेट (स्टिल) 06 नग, लायटर 02 नग, गंज (जर्मन) 02 नग, कैची 01 नग, मेडीकल किट, पाणी कॅन 05 नग इत्यादी दैनंदिन वापरातील साहित्य जप्त करण्यात आले आहे. विशेष अभियान पथकाची सर्व पथके आज गडचिरोलीला सुखरूप पोहोचले आहे. छत्तीसगड सीमेवर माओवादविरोधी कारवाया तीव्र करण्यात आल्या आहेत.


Post a Comment

0 Comments