महिला रुग्णालयात 26 रक्तदात्यांनी केले रक्त दान - शिवकल्याण संस्था आणि सूर्योदय अभ्यासिकेचा पुढाकार


शिवकल्याण संस्था आणि सूर्योदय अभ्यासिकेचा पुढाकार


गडचिरोली ::
रक्तदान श्रेष्ठ दान समजल्या जाते त्याचेच महत्व ओळखून शिवकल्याण युथ मल्टीपरपज डेव्हलपमेंट असोसिएशन गडचिरोली, संस्थेच्या द्वितीय वर्धापन दिनाचे औचित्य साधून, शिवकल्याण संस्था आणि सूर्योदय अभ्यासिका गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने, जिल्हा सामान्य महिला रुग्णालय गडचिरोली येते 7 जून 2024 रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करन्याय आले होते. 
या रक्तदान शिबिरात शिवकल्याण संस्थाध्यक्ष अनुप कोहळे, सूर्योदय अभ्यासिकेचे संचालक राहुल भांडेकर, मनोज पीपरे, दुष्यन्त कुणघाडकर, जावेद खान, महेंद्र लटारे, सुशील भांडेकर, ताराचंद भांडेकर, विकेश दूधबळे, सुमित लांजेवार, अभिषेक चौधरी, रेमाजी मडावी, पृथ्वीराज खंडारे, आकाश मोहुर्ले, विकी सोनुले, महेश बालपांडे, डॉ. राहुल ठवरे, राजेंद्र जुमनाके, कोमल चुनारकर, देविदास समर्थ, सुनील सातपुते, शुभम पीपरे, रोशन सोमनकर सह ऐकून 26 रकदात्यांनी रक्तदान केले.
तर या रक्तदान शिबिराच्या यशश्वितेकरीता Bto डॉ अशोक तुमरेटी, Bto डॉ अंकित गिरीपुंजे, पी आर ओ आकाश आंबोरकर, सिस्टर समता खोब्रागडे, रक्तपेढी तंत्रज्ञ गणेश साळवे, सहाय्यक प्रमोद देशमुख, हरिदास शेगोकार, अजय सोमनकर, गणेश सूत्रपवार, प्रफुल आंबोरकर, मयूर गावतुरे, विकी मादेशवार यांनी सहकार्य केले.  
 अति जास्त उष्णता असताना देखील सामाजिक जाण लक्षात घेऊन या शिबिरात मोठ्या संख्येने युवा रक्तदात्यांनी सहभाग घेतले व रक्तदान केले त्याबद्दल शिवकल्याण संस्थाध्यक्ष अनुप कोहळे आणि सूर्योदय अभ्यासिकेचे संचालक राहुल  भांडेकर यांनी रक्तदात्यांचे आणि सहयोगी सर्वांचे आभार मानले.

Post a Comment

0 Comments