पावसाळ्यात घराबाहेर पडताना विजांपासून काळजी घ्या- आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचे जनतेला आवाहन

पावसाळ्यात घराबाहेर पडताना विजांपासून काळजी घ्या-
आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचे जनतेला आवाहन

वीज पडून मृत्यू पावलेल्या गुरुदेव मनिराम गेडाम वय ४२ वर्ष रा गोवर्धन (कूनघाडा रै.) व वैभव देवेंद्र चौधरी वय २१ वर्ष रा. शंकरपूर हेटी यांच्या परिवाराची  सांत्वन पर भेट


 गडचिरोली

बदलत्या वातावरणामध्ये  विजा पडून मृत्यू पावणाऱ्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत असून पावसाळ्यामध्ये विजांचा कडकडाट सुरू असताना घरा  बाहेर पडताना काळजी घ्यावी असे आवाहन आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी जनतेला केले आहे.
दिनांक ६ जून रोजी आलेल्या आकस्मिक वादळ वारा पाऊस व विजांच्या कडकडाटांमध्ये अनेक निष्पाप लोकांचा मृत्यू झाला असून ह्या घटना अत्यंत दुखद आहेत.  गुरुदेव मनिराम गेडाम वय ४२ वर्ष रा गोवर्धन (कूनघाडा रै) व वैभव देवेंद्र चौधरी वय २१ वर्ष राहणार शंकरपूर हेटी यांच्या अंगावर  वीज पडल्याने त्यांचे दुःखद निधन झाले.  सदर बाब आमदार महोदयांना लक्षात येताच त्यांनी तात्काळ रुग्णालयात जाऊन मृतकाच्या परिवाराची भेट घेतली व सांत्वन केले.  जनतेने अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनाने केलेल्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन केले.

Post a Comment

0 Comments