भारतीय स्वातंत्र्यवीर शहीद राजे बाबुराव पुल्लेसूरबापू शेडमाके यांच्या स्मारकाच्या अनावरण

 भारतीय स्वातंत्र्यवीर शहीद राजे बाबुराव पुल्लेसूरबापू शेडमाके यांच्या स्मारकाच्या अनावरण सोहळ्याला ऍड. विश्वजीत मारोतराव कोवासे सचिव महाराष्ट्र युवक काँग्रेस यांची उपस्थिती.



चामोर्शी: दिनांक 09 जून 2024 रोजी जागतिक गोंड सगा मांदी  यांच्या सौजन्याने मौजा सोमनपल्ली, तालुका चामोर्शी, जिल्हा गडचिरोली,  येथे   गोंडवाना विदर्भातील जल, जंगल, जमीन, स्वराज्य व संस्कृती रक्षणासाठी ब्रिटिश व इतर जुलमी राजवटी विरुद्ध विद्रोह करणारे शहीद राजे बाबुराव शेडमाके यांच्या स्मारकाच्या अनावरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.   इथल्या परिसरातील ज्वलंत प्रश्न म्हणजे जमीन अधिग्रहणाचा परंतु आम्ही जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत या केंद्रातील निर्लज्ज सरकारला तुमची अनधिकृत जमीन अधिग्रहण करू देणार नाही. आपण सर्व एकसंग राहून सर्व धर्म समभावाची भावना जोपासून गुण्यागोविंदानं नांदाव अशी ग्वाही सुद्धा या कार्यक्रमाच्या निमित्ताने ऍड. विश्वजीत मारोतराव कोवासे सचिव महाराष्ट्र युवक काँग्रेस यांनी ग्रामस्थांना दिली.

यावेळी कार्यक्रमाला उपस्थित डॉ. नामदेव उसेंडी माजी आमदार नीलकंठ पाटील निखाडे सरपंच ग्रामपंचायत सोमनपल्ली, निलेश मडावी उपसरपंच निनाद देटेकर सदस्य, मुन्ना गोंगले युवक काँग्रेस, मंगलाताई भेंडारे पोलीस पाटील, संदीप नेवारे, ठाकूर सर, शेडमाके मॅडम, गणपती मोहुरले, प्रल्हाद गोडबोले, नंदाताई कुलसंगे सरपंच ग्रामपंचायत ठाकरी, कार्यक्रमाचे सयोजक बाबुराव कुलसंगे शिक्षक व मोठ्या संख्येने सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments