मुखेडीच्या जंगलात अस्वलाची शिकार; सात आरोपींना न्यायालयीन कोठडी तीन बंदुका, ३ मोटारसायकल जप्त

मुखेडीच्या जंगलात अस्वलाची शिकार; सात आरोपींना न्यायालयीन कोठडी
तीन बंदुका, ३ मोटारसायकल जप्त

गडचिरोली

आलापल्ली वनविभागातील पेडीगुडम वन परिक्षेत्रातील चंदनवेली परिसरातील मुखडी गावच्या जंगलात अस्वलासह अन्य एका वन्यप्राण्याची शिकार रविवार, ९ जून रोजी करण्यात आली. याप्रकरणी गेदा येथील सात आरोपींना ११ जून रोजी वनाधिकाऱ्यांनी अटक केली. या आरोपींनी मांस खाण्यासाठी अस्वलाची शिकार केली असल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले आहे. सर्व आरोपींना गुरुवार, १३ जून रोजी अहेरी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. :

मुल्ला मट्टामी, दिवाकर मरकम, गणेश मट्टामी, राजू गुंडरू, विजय पाडा,

तीन बंदुका, ३ मोटारसायकल जप्त

सातही आरोपींकडून अस्वलाचे मांस, नखे, कातडे, तसेच जाळलेले शेकरूसदृश एका वन्यप्राण्याचा काही भाग जप्त केला. याशिवाय तीन भरमार बंदुका, शिकारीसाठी वापरलेले साहित्य, जंगलात जाण्याकरिता वापरलेल्या तीन मोटारसायकल आदी साहित्य जप्त केले आहे.
नीलेश पदा, कोपा गुंडरू (सर्व रा. गेदा, ता. एटापल्ली) अशी आरोपींची नावे आहेत. मुखडीच्या जंगलात अस्वलाची शिकार करून मांसाची विल्हेवाट लावण्याच्या तयारीत असताना वनविभागाच्या पथकाने धाड टाकून
अस्वलाचे मांस, डोके व पाय जप्त केले. मात्र, त्यापूर्वी वनविभागाच्या पथकाची चाहूल लागताच आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. वन विभागाचे पथक आरोपींच्या मागावर होते. दरम्यान, मंगळवार, ११ जून रोजी वन परिक्षेत्र अधिकारी भावना अलोने व प्रदीप बुधनवार यांच्या पथकाने सातही आरोपींना अटक केली. त्यांना १२ जून रोजी न्यायालयात हजर केले असता १ दिवसाची वनकोठडी सुनावली. १३ जून रोजी आरोपींना पुन्हा न्यायालयात हजर केले असता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली, अस्वल शिकार प्रकरणाची कारवाई आलापल्लीचे उपवनसंरक्षक राहुलसिंह टोलिया यांच्या मार्गदर्शनात वनाधिकाऱ्यांनी केली.

Post a Comment

0 Comments