गडचिरोली पोलीस दादालोरा खिडकी व एकात्मीक आदिवासी विकास प्रकल्प, भामरागड यांच्या संयुक्त विद्यमाने प्रोजेक्ट उडाण अंतर्गत अतिदुर्गम भागातील शेतकरी कृषीदर्शन व अभ्यास दौरा सहलीकरीता रवाना


गडचिरोली पोलीस दादालोरा खिडकी व एकात्मीक आदिवासी विकास प्रकल्प, भामरागड यांच्या संयुक्त विद्यमाने प्रोजेक्ट उडाण अंतर्गत अतिदुर्गम भागातील शेतकरी कृषीदर्शन व अभ्यास दौरा सहलीकरीता रवाना

आतापर्यंत तेरा कृषी सहलीतून 550 शेतक­यांनी घेतला कृषी दर्शन सहलीचा लाभ


गडचिरोली,
 गडचिरोली जिल्ह्रातील शेतकरी पारंपरिक पध्दतीने शेती करीत आहेत. त्यामुळे शेती मधुन प्राप्त होणारे उत्पन्न तुटपुंजे असल्याने त्यांच्या आर्थिक विकासास अडथळा निर्माण होऊन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यास अडचण निर्माण होत आहे. जिल्ह्रातील शेतकरी जिल्ह्राबाहेर पडून, पारंपरिक शेतीला बगल देत विविध क्लृप्त्यांचा वापर करीत अत्याधुनिक शेती करणा­या शेतक­यांच्या बांधावर जावुन तेथील परिस्थीतीची, आधुनिक शेती व उपकरणांची पाहणी करतील व त्या ज्ञानाचा वापर करून पारंपरिक शेती पध्दतीत बदल करतील व जिल्ह्रातील महिला शेतक­यांची आर्थिक प्रगती व्हावी या उद्देशाने, मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा. यांचे संकल्पनेतून गडचिरोली जिल्ह्रातील पोस्टे एटापल्ली, कोटमी, पिपली बुर्गी, गट्टा (जां.), आलदंडी, वांगेतुरी, भामरागड, धोडराज, कोठी, नारगुंडा, ताडगाव, मन्नेराजाराम, उपपोस्टे कसनसूर, लाहेरी, पोमकें हालेवारा, बोलेपल्ली, हेडरी, बुर्गी (ये.), सुरजागड व गर्देवाडा हद्दीतील एकुण 40 शेतक­यांकरीता गडचिरोली पोलीस दलाच्या पोलीस दादालोरा खिडकी व एकात्मीक आदिवासी विकास प्रकल्प, भामरागड यांचे संयुक्त विद्यमाने “प्रोजेक्ट उडाण अंतर्गत” तेराव्या कृषीदर्शन सहलीचे आयोजन करण्यात आले आहे. 
यापुर्वी झालेल्या एकुण बारा कृषी दर्शन सहल व अभ्यास दौ­यांमध्ये दुर्गम भागातील विविध उपविभागातून एकुण 510 महिला व पुरुष शेतक­यांनी आपला सहभाग नोंदविला आहे. या तेराव्या सहलीमध्ये एटापल्ली, भामरागड व हेडरी उपविभागातील पोस्टे/उपपोस्टे/पोमकें हद्दीतील अतिदुर्गम भागातील 40 शेतक­यांनी आपला सहभाग नोंदवला आहे. या सहली दरम्यान सहभागी शेतकरी वरोरा, वर्धा, घातखेड, बडनेरा, अकोला, शेगाव, जळगाव, राहुरी जि. औरंगाबाद, वाशीम, येथील कृषी विज्ञान केंद्र तसेच विविध शेती प्रक्षेत्र यांना भेटी देणार आहे. तसेच गणेशखिंड जि. पुणे येथील फळ संशोधन केंद्र व नागपूर येथील लिंबुवर्गीय संशोधन केंद्राला सुद्धा भेट देणार आहे.  त्याचप्रमाणे शेतीविषयक अत्याधुनिक व प्रगत तंत्रज्ञान जाणुन घेणार आहेत. यामुळे ते प्रगत तंत्रज्ञानाचे अनुभव आपल्या शेती व्यवसायामध्ये वापरून आपली आर्थिक उन्नती साधुन जिवनमान उंचावतील त्यामुळे जिल्ह्रातील विकासात त्यांचे योगदान असणार आहे.

सदर कार्यक्रम पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांचे मार्गदर्शनात दि. 13/06/2024 पासुन दि. 22/06/2024 रोजी पर्यंत एकुण 10 दिवस आयोजीत करण्यात आला असून, या तेराव्या कृषीदर्शन सहल व अभ्यास दौरा कार्यक्रमास मान्यवरांनी हिरवी झेंडी दाखवून शुभेच्छा दिल्या.  यावेळी पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल व अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. यतिश देशमुख हे उपस्थित होते. 
कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता सर्व उपविभागीय अधिकारी सर्व पोस्टे/उपपोस्टे/पोमकेंचे प्रभारी अधिकारी तसेच नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी पोउपनि. धनंजय पाटील, पोउपनि. चंद्रकांत शेळके व अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments