गोकुळनगर येथे दरवर्षी प्रमाणे यंदाही तान्हापोळ्याचे भव्य आयोजन

गोकुळनगर येथे दरवर्षी प्रमाणे यंदाही तान्हापोळ्याचे भव्य आयोजन


गडचिरोली,
हनुमानमंदीर देवस्थान समितीचे वतीने मागील चार दशकांपासून हनुमान मंदीर वॉर्ड क्रमांक 23 येथील हनुमान मंदीर परिसरात दरवर्षी तान्हा पोळ्याचे आयोजन करण्यात येते, तीच परंपरा जोपासून यंदाही फार मोठ्या उत्साहाने आयोजन करण्यात आले होते. परिसरातील असंख्य बालक, तथा त्यांचे आईवडील आप आपल्या मुलांनावेशभूषा करून खुप मोठ्या संख्येने उपस्थित झाले. दरवर्षी प्रमाणे यंदाही बालगोपालांना तान्हा पोळ्याच्या औचित्यावर विजय गोरडवार नगर परिषद माजी सभापती तथा शहरअध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांचे हस्ते शालेय साहित्यांची भेट देण्यात आली. यावेळी नईम शेख जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भास्कर निमजे सामाजिक कार्यकर्ते,मिनल चिमूरकर माजी नगरसेविका, अमोल कुळमेथे राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहरअध्यक्ष, वॉर्डातील प्रतिष्ठित नागरिक दलीत मित्र नानाजी वाढई महाराज,अशोक आक्केवार, निखिल चरडे,नवनाथ वाढई, स्वप्नील भांडेकर,उज्वला भांडेकर, नितिन रोहनकर, साजेश चंदनखेडे, संदीप बंडीवार, मनोहर दंडीकवार, सोमाजी भोयर, सुरेश भोयर, अमोल दासरवार, लक्ष्मण बावणे, रुपेश आनंदपवार, रामभाऊ चापले, राहुल अलोने आदी मान्यवर मंडळी उपस्थित होती, या कार्यक्रमाचे आयोजना करीता, प्रकाश कंपलवार, मुकेश मेश्राम, निकेश कांबळे, प्रमोद भोयर, विष्णू वासेकर, योगेश वाळके, रुपेश दंडीकवार, अविनाश कंपलवार, आदींनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments