विद्यार्थ्यांची नियमित आरोग्य तपासणी आवश्यक : योगिता पिपरे

विद्यार्थ्यांची नियमित आरोग्य तपासणी आवश्यक : योगिता पिपरे




गडचिरोली : शालेय विद्यार्थ्यांची नियमित आरोग्य तपासणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन भाजपाच्या जिल्हा महामंत्री तथा माजी नगराध्यक्ष योगिता पिपरे यांनी केले.

इनर व्हील क्लब ऑफ गडचिरोली, सिटी हॉस्पिटल व विद्याभारती हायस्कूल गोगावच्या संयुक्त विद्यमाने विद्याभारती हायस्कूल गोगाव येथे १५ जुलै रोजी रक्त गट तपासणी व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करून शालेय विद्यार्थ्यांची मोफत रक्त गट व आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी त्या बोलत होत्या. प्रमुख अतिथी म्हणून इनर व्हील क्लब ऑफ गडचिरोलीच्या

जिल्हाध्यक्ष वैशाली बडूवार, डॉ. खुशबू दुर्गे, विद्याभारती हायस्कूल गोगावच्या मुख्याध्यापिका प्रतिभा रामटेके, इनर व्हील क्लबच्या कोषाध्यक्ष सरस्वती परतानी, सचिव शालू भुसारी, उपाध्यक्ष शिल्पा हेमके, ममता बियाणी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. खुशबू दुर्गे व त्यांच्या चमूद्वारे इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी व रक्त गट तपासणी करण्यात आली. पुढे योगिता पिपरे यांनी इनर व्हील क्लब व सिटी हॉस्पिटलने एक चांगला उपक्रम सुरू केला असून त्यांचे हे कार्य कौतुकास्पद असल्याचे म्हणाले. शिबिराला इनर व्हील क्लबचे पदाधिकारी, सदस्य, सिटी हॉस्पिटलचे कर्मचारी व विद्याभारती हायस्कूल गोगावचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments