अखेर पाथरगोटाला स्वतंत्र ग्रामपंचायतचा दर्जा

अखेर पाथरगोटाला स्वतंत्र ग्रामपंचायतचा दर्जा   
माजी आ. कृष्णा गजबे यांच्या प्रयत्नांना यश


आरमोरी,

आरमोरी गेल्या अनेक दशकांपासून प्रलंबित असलेला पाथरगोटा ग्रामपंचायतीचा प्रश्न माजी आमदार कृष्णा गजबे यानी शासनदरबारी पाठपुरावा करून पळसगाव ग्रामपंचायतमधून स्वतंत्र ग्रामपंचायत म्हणून पाथरगोटा नुकतीच अस्तित्वात आली आहे. पाथरगोटा गावाची लोकसंख्या ११०० असून पाहिजे त्या प्रमाणात सुविधाचा लाभशासनाकडून मिळत नव्हता. त्यामुळे गावकऱ्यांनी पाथगोटाला गावाला स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा देण्याची मागणी केली होती. माजी आ. कृष्णा गजबे यांच्या प्रयत्नामुळे पाथरगोटाला गावाला स्वतंत्र ग्रामपंचायत मिळाली आहे.
गावात उन्हाळ्यामध्ये पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. गावात विद्युत खांबावर अपुरे पथदिवे, नाली-रस्ते नाही,

माजी आ. कृष्णा गजबे यांच्या प्रयत्नांना यश

यामुळे पावसाळ्यात देखील येथील नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत होता. गावातील ही परिस्थिती बघता माजी आमदार कृष्णा गजबे यांनी आपल्या निधीतून गावात सभामंडप, रस्ते, नाली असे अनेक विकासकामे करून दिले. परंतु गाव मोठा असल्याने ही सोयीसुविधा पुरेशी नव्हती. त्यामुळे त्यांनी स्वतः या गावाला स्वतंत्र ग्रामपंचायतचा दर्जा मिळवण्यासाठी धावपळ सुरू केली आणि शेवटी त्यांच्या प्रयत्नांना यश आले.
माजी आमदार गजबे यांनी
ग्रामपंचायत स्तरावरून प्रस्ताव बनवून ते जिल्हा परिषदमार्फतीने शासन स्तरावर मंत्रालयात स्वतः टेबल फाइल हलवून २० जून २०२५ रोजी शासनाने उपसचिव यांच्या आदेशाने अधिसूचना निर्गमित केली आणि २६ जून रोजी महाराष्ट्र शासनाचे कक्ष अधिकाऱ्यांमार्फत जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, गट ग्रामपंचायत पळसगावचे विभाजन करून नव्याने ग्रामपंचायत पाथरगोटा या महसुली गावाची स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन

करण्याबाबतची अधिसूचना निघाली आणि पाथरगोटा ग्रामपंचायतींच्या आनंद भरभरून वाहत होता. याबद्दल गावकऱ्यांनी माजी आमदार कृष्णा गजबे यांचे गावात बॅनर लावून आभार मानले.

मात्र ही ग्रामपंचायत अस्तित्वात निर्माण झाली. परंतु या गावांमध्ये आदिवासींची लोकसंख्या नसताना सुद्धा नव्याने आरक्षण काढल्यानंतर पाथरगोटा या गावाचे सरपंच पद हे अनुसूचित जमातीसाठी राखीव झाले असल्याने हा प्रशासनाचा भोंगळ कारभार या ठिकाणी दिसून येत आहे. कारण सन १९८०-८५ या राज्य शासनाच्या निघालेल्या पेसाअंतर्गत अधिसूचनेमध्ये नवरगाव आणि पाथरगोटा हे दोन्ही गाव पेसाच्या यादीत असल्याने सरपंचपद पहिल्यांदाच अनुसूचित जमातीसाठी राखीव गेल्याने येथील इतर समाजाच्या लोकांचा हिरमोड झाला आहे.

Post a Comment

0 Comments