वनहत्तीमुळे झालेल्या नुकसानीचे अर्थसहाय्य होणार वितरीत

वनहत्तीमुळे झालेल्या नुकसानीचे अर्थसहाय्य होणार वितरीत
आमदार गजबेंच्या हस्ते नुकसानग्रस्तांना देण्यात येणार नुकसान भरपाई
वनमंञी सुधीर मुनगंटीवारांनी आ.गजबेंना केले प्राधिकृत


     गडचिरोली,
 जिल्ह्यात वडसा वन विभागा अंतग॔त येत असलेल्या कुरखेडा तालुक्यातील अनेक गावांत छत्तीसगड राज्यातुन स्थलांतरित झालेल्या जंगली हत्तींनी धुमाकुळ घालुन शेतपिकाचे,शेती अवजारांचे तसेच घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते.त्यानुसार झालेल्या नुकसानीचा पंचनामा शासनाला सादर करण्यात आला असून त्या अनुषंगाने वनहत्तींमुळे झालेल्या नुकसानीचे अर्थसहाय्य वितरीत करण्यासाठी राज्याचे वनमंञी ना.सुधीर मुनगंटीवार यांनी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबेंना प्राधिकृत केले असून ५ ऑगस्ट २0२३ रोजी नुकसानग्रस्तांना धनादेश वितरित करण्यात येणार आहे.
    यावर्षी २०२३-२४ मध्ये २१ जुलै २०२३ रोजी अंदाजे २२-२३ जंगली हत्तींचा कळप गोंदिया जिल्ह्यातील गोठणगाव मार्गे कुरखेडा परिक्षेञातील चारभट्टी,पिंटेसुर बिटामध्ये दाखल झाले होते. सदर क्षेञात जंगली हत्तींनी अंदाजन ३० शेतकऱ्यांच्या शेतीची नुकसान केली त्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचा मोका पंचनामा करून शासन निर्णयानुसार नुकसान भरपाई देण्याची कारवाई करण्यात आली असतानाच सदर कळपाने २२ जुलै २०२३ रोजी पुराडा वन परिक्षेञातील उपक्षेञ हिडिकीकन्हार गावात दाखल होऊन २५ जुलै पर्यंत व त्यानंतर २६ जुलै पासुन ३१ जुलै पर्यंत पुराडा परिक्षेञातील कोहका,दादापुर परिक्षेञात वास्तव्यास राहुन १ ऑगस्ट २०२३ रोजी आंबेझरी गावातील १४ घरांचे नुकसान केले आहे.
     सदर जंगली हत्तीच्या कळपाने २ ऑगस्ट २०२३ रोजी पुराडा परिक्षेञातुन सोनसरी मार्गे देलनवाडी परिक्षेञातील चिचेवाडा बिटातिल चांदोना गावातील ८ शेतकऱ्यांच्या शेतीची नुकसान केली असून उपरोक्त वन परिक्षेञातील वनाधिकाऱ्यांनी झालेल्या नुकसानीची मोका चौकशी करून नुकसानीचे पंचनामे शासनाला सादर केले आहेत. 
    त्या अनुषंगाने पुराडा परिक्षेञातील १४ घरांच्या नुकसानीचे ७ लाख,१३० शेतकऱ्यांच्या शेतपिकाच्या नुकसानीपोटी १८.२० लक्ष, कुरखेडा परिक्षेञातील ३० शेतकऱ्यांच्या शेतपिकाच्या नुकसानीपोटी ४.२० लक्ष तसेच देलनवाडी परिक्षेञातील ८ शेतकऱ्यांच्या शेतपिक नुकसानीपोटी १.१२ लक्ष असा एकुण १८२ नुकसानग्रस्तांना ३०.५२ लक्ष रुपयाचा निधी आमदार गजबे यांच्या हस्ते वितरीत करण्यात येणार आहे. याबाबत महाराष्ट्र वनमंञी सुधीर मुनगंटीवारांनी यांनी आमदार कृष्णा गजबेंना  प्राधिकृत केले असून नुकसान भरपाई ५ ऑगस्ट २०२३ रोजी वितरीत करण्यात येणार आहे.

Post a Comment

0 Comments