गडचिरोली पोलीस दलाच्या पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून व्हि.एल.ई. साठी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन
गडचिरोली,
गडचिरोली पोलीस दलाच्या पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली दुर्गम-अतिदुर्गम भागातील नागरिकांसाठी पोलीस दादालोरा खिडकी अंतर्गत काम करणाया ‘V.L.E.’ (Village Level Entrepreneur) युवक-युवतींसाठी एक दिवसीय कार्यशाळा आज दि. 17/07/2025 रोजी पोलीस मुख्यालय येथील एकलव्य हॉल येथे पार पडली.
सदर कार्यशाळेकरीता 37 V.L.E. प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. या कार्यशाळेत त्यांना C.S.E कडुन राबविल्या जाणाया विविध शासकिय योजनांची माहिती देण्यात आली. या प्रशिक्षणामुळे दुर्गम-अतिदुर्गम भागातील नागरिकांना पोलीस दादालोरा खिडकी अंतर्गत बँक सेवा, आयुष्यमान भारत कार्ड, आभा कार्ड, सेव्हींग अकाऊंट, ई-श्रम कार्ड, पेंशन सर्विस, इन्शुरंस, लाडकी बहिण योजना, पिक विमा योजना या सारख्या सुविधा त्यांच्या दारातच उपलब्ध करून देण्यासाठी सोईचे होणार आहे. कार्यक्रम प्रसंगी पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. नीलोत्पल यांनी उपस्थित V.L.E. ना मार्गदर्शन करताना सांगितले की, ‘सर्व ज्.ख्र्.क. यांनी आपल्या हद्दीतील नागरीकांना विविध शासकिय योजनांचा लाभ द्यावा. यासोबतच अतिदुर्गम भागातील शेवटच्या नागरिकापर्यंत पोहचून आपण जास्तीत जास्त नागरीकांना शासकिय योजनांचा लाभ मिळवून द्यावा व अतिदुर्गम भागातील नागरिकांसाठी तुम्हीच प्रशासनाचा चेहरा असून याच जबाबदारीने आपण सर्वांनी दुर्गम भागात काम करावे.’
यानंतर कार्यक्रमास उपस्थित असलेले जिल्हा व्यवस्थापक C.S.E गडचिरोली श्री. स्वप्नील सोनटक्के, जिल्हा प्रतिनिधी प्रधानमंत्री फसल विमा योजना, गडचिरोली श्री. राकेश रायलालवार, जिल्हा ृप्रतिनिधी आयुष्यमान भारत योजना, गडचिरोली श्री. सुमेध आजेगावकर यांनी उपस्थित सर्व V.L.E. ना मार्गदर्शन केले. गडचिरोली पोलीस दलाच्या पोलीस दादालोरा खिडकी अंतर्गत प्रोजेक्ट प्रगती, प्रोजेक्ट विकास, प्रोजेक्ट उडाण, प्रोजेक्ट उत्थान, प्रोजेक्ट कृषी समृद्धी या उपक्रमांच्या माध्यमातून कम्युनिटी पोलीसींगचे पोस्टे/उपपोस्टे/पोमकें स्तरावर काम करणारे अंमलदार आणि V.L.E. यांचे तर्फे आजपर्यंत एकुण 10,46,284 नागरिकांपर्यंत विविध शासकिय योजनांचा लाभ पोहचविणे शक्य झाले आहे.
सदर कार्यशाळेच्या कार्यक्रम प्रसंगी पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. नीलोत्पल तसेच जिल्हा व्यवस्थापक C.S.E. गडचिरोली श्री. स्वप्नील सोनटक्के, जिल्हा प्रतिनिधी प्रधानमंत्री फसल विमा योजना, गडचिरोली श्री. राकेश रायलालवार, जिल्हा प्रतिनिधी आयुष्यमान भारत योजना, गडचिरोली श्री. सुमेध आजेगावकर हे उपस्थित होते.
या कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी जिल्ह्रातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी पोउपनि. चंद्रकांत शेळके व सर्व पोलीस अंमलदार यांनी विशेष परीश्रम घेतले.
0 Comments