रानखेडा येथील मंदिर बांधकामाला आर्थिक मदत करून प्रबोधनकारांना आदरांजली


रानखेडा येथील मंदिर बांधकामाला आर्थिक मदत करून प्रबोधनकारांना आदरांजली 

जिल्हा सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांच्या पुढाकार
प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांची जयंती सेवाभाव जोपासून साजरी




गडचिरोली,
ऐंशी टक्के समाजकारण व विस टक्के राजकारण या धोरणानुसार शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा सहसपंर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांच्या वतीने समाजसुधारक, संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे प्रणेते प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांची जयंती सेवाभाववृत्तीने साजरी करून आदारांजली वाहण्यात आली. अरविंदभाऊ कात्रटवार यांच्या वतीने गडचिरोली तालुक्यातील मौशीखांब - मुरमाडी जि.प. क्षेत्रातील रानखेडा येथे मंदिराच्या कळस बांधकामासाठी आर्थिक मदत देण्यात आली. यावेळी मार्गदर्शन करतांना उबाठाचे जिल्हा सहसपंर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार म्हणाले की, सामाजिक सुधारणा हे प्रबोधनकारांच्या जीवनाचे ध्येय होते. ध्येयप्राप्तीसाठी त्यांनी कधीच कोणतीही तडजोड केली नाही. उत्तम वक्तृत्व, लेखन आणि प्रत्यक्ष कृतीच्या आधारे समाजातील सर्व घटकांच्या कल्याणासाठी लढा दिला. त्यांनी सामाजिक सुधारणांना प्राधान्य दिले. प्रबोधन या मासीकामुळे ते प्रबोधनकार ठाकरे म्हणून ख्यातीप्राप्त झाले. प्रबोधनकारांचे पुत्र शिवसेना प्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे यांनी जनतेच्या कल्याणासाठी शिवसेना निर्माण केली. मा. बाळासाहेबांनी निर्माण केलेल्या शिवसेनेची मुळ संकल्पना जोपासूनच ऐंशी टक्के समाजकारण व विस टक्के राजकारण या धोरणानुसार आपल्या हातून जनसेवेचे कार्य सुरू आहे. जनसेवेतून मिळणारा आनंद हा अमुल्य असतो. रानखेडा येथील मंदिर बांधकामाला हातभार लावण्यासाठी मिळालेली संधी ही पुण्यकार्य असल्याचे अरविंदभाऊ कात्रटवार म्हणाले. उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा एक कट्टर शिवसैनिक म्हणून गडचिरोली तालुक्यातील मौशीखांब- मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रा़च्या सर्वांगीण विकासासाठी सदैव कटीबध्द असल्याची ग्वाही कार्यक्रमाप्रसंगी दिली.
*याप्रसंगी यादव लोहबरे, पांडुरंग समर्थ, संजय बोबाटे, टिकाराम पानसे, गणेश दहलकर, यादव चौधरी, संतोष चौधरी, लालाजी आवारी, हरिश्चंद्र मडावी, विश्वनाथ झाडे, हरिश्चंद्र घुबडे, सूर्यभान झाडे, सुनील पानसे, पंढरी मलोडे, प्रकाश लेणगुरे, बाबुराव चौधरी, रामदास मडावी, महादेव कुरुटकार, मधुकर गेडाम, वासुदेव सेलोटे, पुरुषोत्तम गजपुरे, जीवन कुरुटकर, हर्षद दहलकर, सुरज आवारी, धर्माजी तिवाडे, प्रज्वल झाडे, हिराजी पानसे, प्रमोद कोरेते, किशोर दहलकर, मंगेश घुबडे, डबाजी तिवाडे, रामचंद्र दहलकर, कमलेश पानसे, डोमाजी झाडे, काशिनाथ माडमवार, दिपक पानसे, मनोहर मडावी, आशिष आवारी, पांडुरंग पानसे, सोनीताई कुरटकर, सुशीला मलोडे, वच्छलाबाई दहलकर, सरिता गेडाम, वच्छलाबाई तुमराम, गुणाबाई झाडे, शारदा पानसे, सोनी घुबडे, गायत्री पानसे, अर्चना नागापुरे, आयुषा झाडे, सिमा सूर्यवंशी, पूजा तिवाडे, निर्मला चौधरी, आचल नागापुरे, उज्वला चौधरी, ऐश्वर्या गावतूरे, मोनी चौधरी, गुंजन तिवाडे यासह असंख्य शिवसैनिक व रानखेडा येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments