हरडे कृषी महाविद्यालयात राष्ट्रीय मतदान दिवस

हरडे कृषी महाविद्यालयात राष्ट्रीय मतदान दिवस.


चामोर्शी, 
येथील केवळराम हरडे कृषी महाविद्यालयात राष्ट्रीय मतदान दिवस साजरा करण्यात आला.
यावेळी अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ आदित्य कदम तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा.तुषार पाकवर, अतिथी म्हणून प्रा.भांडारकर, रासेयो कार्यक्रम अधिकारी निखिता येलमुले आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर व डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीपप्रज्वलनाने करण्यात आली याप्रसंगी प्राचार्य डॉ.आदित्य कदम यांनी मतदानाचे महत्त्व पटवून देऊन मतदान करून विचार करण्यापेक्षा समोरचा उमेदवार कसा आहे त्याची कार्यक्षमता कार्य आहे हे ओळखूनच मतदान करावे ,मतदान करणे प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे तो सर्वांनी बजावला पाहिजे, असे त्यांनी सांगितले मतदान दिवसाचे ओचित्य साधून महाविद्यालयात निबंध स्पर्धा घेण्यात आल्या संचालन सेजल सोनकुसरे तर आभार साक्षी पांढरे यांनी मानले.

Post a Comment

0 Comments