राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे ओबीसी सेल प्रदेशाध्यक्ष गडचिरोलीत

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे ओबीसी सेल प्रदेशाध्यक्ष गडचिरोलीत


गडचिरोली,
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ओबीसी सेल प्रदेशाध्यक्ष राज राजापुरकर  यांचे प्रमुख मार्गदर्शनात दिनांक ३० /९/२०२३ रोजी दु.१२.०० वाजता गडचिरोली येथील पत्रकार भवनात राष्ट्रवादी काँग्रेस च्या ओबीसी सेल विभागाची बैठक होणार असून,या बैठकीला अध्यक्ष म्हणून अतुल गण्यारपवार जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस गडचिरोली हे राहणार आहेत, तर विशेष अतिथी म्हणून प्रदेश सरचिटणीस सुरेश पोरेड्डीवार, प्रदेश चिटणीस संजय ठाकरे, तसेच प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस गडचिरोली तालुकाध्यक्ष प्रदीप चुधरी , गडचिरोली शहरअध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस तथा 
माजी सभापती न. प. गडचिरोली विजय गोरडवार, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष नईम शेख , नगरसेवक चामोर्शी तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अमोल गण्यारपवार आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत . तरी या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या संपूर्ण ओबीसी सेल च्या पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शेमदेव चाफले जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल गडचिरोली यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments