रानटी हत्तीचा तात्काळ बंदोबस्त करा ; अन्यथा मख्य वनसंरक्षक कार्यालयाला जिल्हा काँग्रेस करणार घेराव आंदोलन महेंद्र ब्राह्मणवाडे यांचा वनविभागाला ईशारा

रानटी हत्तीचा तात्काळ बंदोबस्त करा ; अन्यथा मख्य वनसंरक्षक कार्यालयाला जिल्हा काँग्रेस करणार घेराव आंदोलन

महेंद्र ब्राह्मणवाडे यांचा वनविभागाला ईशारा



गडचिरोली :: मागील एक दीड वर्षांपासून उडीसा - झारखंड राज्यातील हत्तीचा कळप जिल्हात दाखल झालेला आहे. जिल्ह्यातील अनेक भागात या हत्तीनी धुमाकूळ माजवला असून या मुळे अनेक शेतकरी बांधव आणि गावाकरी ही त्रस्त झाले आहे.
 सतत च्या पावसाने जिल्ह्यातील शेतकरी अगोदरच हवालदिल झालेला होता.  त्या संकटातून कसबसा बाहेर पडत न पडत आता काही भागात धान पीक निसवण्यावर तर काही भागात कापणीवरं आलेला असतांना त्या ठिकाणी हत्तीचा कळप मोठे नुकसान करत आहे. त्यामुळे ह्या संकटामुळे आता अनेक शेतकऱ्यांवर जगावे कीं मरावे असा प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे.
मागील वर्षी राज्य आणि केंद्र सरकार जिल्ह्यातील कमलापूर येथील जिल्ह्याचा अभिमान असलेल्या शांत हत्तीना गुजरात राज्यातील अदानीच्या प्रणिसंग्रहालयात ठेवायला निघाली. मात्र या रानटी हत्तीचा बंदोबस्त करू शकलेली नाही, शासन आणि वनविभागाने आता तात्काळ या रानटी हत्तीचा बंदोबस्त करावा अशी मागणी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी केली आहे. अन्यथा मुख्य वनसंरक्ष कार्यालयाला घेराव आंदोलन करण्याचा इशाराही ब्राह्मणवाडे यांनी दिला आहे.

Post a Comment

0 Comments