आरमोरी तालुक्यातील शेतकऱ्यांना वनविभागाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे तात्काळ पंचनामे करावे-आ.कृष्णा गजबे

आरमोरी तालुक्यातील शेतकऱ्यांना 
वनविभागाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे तात्काळ पंचनामे करावे-आ.कृष्णा गजबे


 

 आरमोरी-
              सध्या  जिल्ह्यामध्ये खरीप हंगामाचे भात रोवणीचे जोमात काम सुरू आहे.  तर कुणाचा रोवना झालेला आहे.अनेक शेतकरी आपल्या शेतावर काम करीत असतात आणि अशातच आरमोरी  तालुक्यातील वैरागड वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या सुकाळा, शिवणी,मोहझरी, व आरमोरी वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या ठाणेगाव,डोंगरगाव,आरमोरी  या गावातील शेतकऱ्यांच्या शेतातून रानटी हत्तीचा कळप  गेल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरलेल्या भात पिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाली आहे..यात  जवळपास २० ते २५  शेतकऱ्यांचे  अतोनात नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती आ.गजबे यांना मिळताच त्यांनी सुकाळा, मोहझरी, शिवणी,डोंगरगाव येथील शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष बांधावर जाऊन,रानटी हत्तीच्या कळपाने नासधूस  केलेली धान पिकांची पाहणी केली.
         आरमोरी तालुक्यातील सुकाळा, शिवणी,मोहझरी ही गावे  तालुका मुख्यालयापासून २० ते २५  कि. मी.अंतरावर असून  या तिन्ही गावातील नागरिकांचा उदरनिर्वाह हा शेतीवर अवलंबून आहे. या भागातील शेतकऱ्यांनी नुकतीच आपल्या शेतात धानपिकांची रोवणी केली.मात्र  दिनांक ०८ ऑगस्ट रोजी ठाणेगाव,डोंगरगाव व आरमोरी गाढवी नदीलगत असलेल्या शेताची रानटी हत्तींनी नासधूस केली होती.तसेच ९ आगस्टला  रात्रोच्या सुमारास रानटी हत्तीच्या कळपाने सुकाळा गावातील शेतकऱ्यांच्या शेतातुन मार्गक्रमण  करीत मोहझरी, शिवणी गावातील शेतकऱ्यांच्या शेतातूनही मार्गक्रमण केल्याने शेतकऱ्यांच्या भात पिकाची मोठी हानी केली. या उभ्या पिकांवर हत्तींचा  कळप चालत गेल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नासधुश झालेली आहे.  ऑगस्ट व १० ऑगस्ट रोजी दैनिक देशोन्नती च्या अंकात "रानटी हत्तींनी केली शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान" तर ११ ऑगस्टला "जंगली हत्तींच्या कळपांचा गावकुसाबाहेर वावर" या मथळ्याखाली बातमी प्रकाशित होताच दिनांक ११ ऑगस्टला आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसान ग्रस्त शेतीची पाहणी केली
  यावेळी  आमदार गजबे यांनी   वन विभागाने तात्काळ पंचनामे करुन  शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळवून देण्याची वनविभागाकडे मागणी केली आहे. लवकरच संबंधित विभागाकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे शेतीचे पंचनामे करून प्रशासनाला सादर करणार असल्याची माहिती वनकर्मचाऱ्यांनी दिली. यावेळी आ.कृष्णा गजबे यांच्यासोबत  आरमोरी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष पवन नारनवरे, भाजपा तालुकाध्यक्ष नंदू पेट्टेवार,भाजयुमो तालुकाध्यक्ष पंकज खरवडे, वैरागड ग्रा.प.चे उपसरपंच भास्कर बोडणे, सुकाळा ग्रा. प.चे सरपंच अविनाश कन्नाके, माजी उपसरपंच भारत भैसारे,मोहझरी ग्रा. प.चे सरपंच मयूर कोडाप,,मोहझरी ग्रा. प.चे सरपंच मयूर कोडाप,आरमोरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी अविनाश मेश्राम,  वैरागड वनपरिक्षेत्र कार्यालयाचे क्षेत्र सहाययक पिलारे, वनरक्षक गजानन सेडमाके, डाँ.बिसेन,प्रेमानंद निकोडे, यासहित शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments