आलापल्ली अत्याचार प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करून त्या' अत्याचाऱ्यांना फाशी द्या
भारतीय जनता पार्टी च्या महिला शिष्टमंडळाची पोलीस अधिक्षक यांच्याकडे मागणी
गडचिरोली:-
आलापल्ली येथे एका शालेय शिक्षण घेत असलेल्या नाबालिक मुलीवर अत्याचार झालेल्या घटनेच्या संबंधित भारतीय जनता पार्टी च्या महिला मोर्चाच्या शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक याला निवेदनाद्वारे भेटी दरम्यान लवकरात लवकर शासनाची मनोधैर्य योजना लागू झाली पाहिजे, तसेच दक्षता कमिटीवर समाजात प्रभावीपणे काम , महिलांचे प्रश्न सोडवणाऱ्या अशा महिलांना दक्षता कमिट्यावर नवनियुक्त करावे, बलात्कार अत्याचार या प्रकरणी पोलीस विभागांनी जनजागृती करावी, असे अनेक महिलाविषयीचे प्रश्न भारतीय जनता पार्टी च्या महिला मोर्चा च्या शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक साहेबाना व्यक्त करत अतिदुर्गम,आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यात शालेय कामानिमित्त आल्लापल्ली येथे गेलेल्या अल्पवयीन आदिवासी विद्यार्थीनीला जबरीने मद्य पाजून अत्याचार करणाऱ्या 'त्या' नराधमांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी भारतीय जनता पार्टीच्या महिला शिष्टमंडळाने गडचिरोली जिल्हाचे पोलीस अधीक्षक निलोत्फर तसेच राज्याचे गृहमंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
पीडिता शालेय कामानिमित्त अहेरी येथून आलापल्लीला आली असता आरोपींनी सदर विद्यार्थिनीला एकटी हेरून तिच्या असहाय्यतेचा फायदा घेत आधी तिला दारू पाजुन तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केला. ही अतिशय निंदनीय घटना असून यामुळे आदिवासी समाजात असंतोष खदखदू लागला आहे. गडचिरोली जिल्हा हा आदिवासीबहुल जिल्हा असुन बहुतांशी आदिवासी हे दऱ्याखोऱ्यात वास्तव्यास आहेत. ९० च्या दशकात येथील आदिवासी अर्धनग्न अवस्थेत वावरत असतानाही अशा मानवतेला काळिमा फासणाऱ्या घटना घडल्याची जिल्ह्याच्या इतिहासात नोंद नाही. आदिवासी मुलींवर अत्याचाराचे कृत्य सातत्याने घडत आहेत. ही बाब अतिशय गंभीर असून कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण करणारी असल्याचे लक्षात घेता या भागात पोलीस गस्त अधिक सक्रिय करणे गरजेचे आहे. दरम्यान घडलेल्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता व जिल्ह्यात घटनेची पुनरावृत्ती होणार नाही, ही बाब लक्षात घेता प्रकरणाशी संबंधित आरोपींना कठोर कारवाई करून फाशीची शिक्षा देण्याची मागणी भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चा प्रदेश चिटणीस रेखाताई डोळस यांनी जिल्हा चे पोलीस अधीक्षक यांच्या मार्फतीने निवेदनाद्वारे महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली आहे.
यावेळी प्रामुख्याने महिला मोर्चा च्या प्रदेश महामंत्री तथा जि.प. सदस्या गोंदिया सौ. रचनाताई गहाने,महिला मोर्चाच्या प्रदेश चिटणीस सौ.रेखाताई डोळस, आदिवासी आघाडीच्या नेत्या तथा माजी सभापतीे रंजिताताई कोडाप, रहीमाताई सिद्दीकी ,पल्लवी बारापात्रे,महिला भाजपा जिल्हा महामंत्री वर्षाताई शेडमाके,दुर्गम ताई ,सुनिता मडावी, तसेच कार्यकर्त्या उपस्थिती होत्या
0 Comments