रायुकाँचे रूपेश वलके यांनी दिले निवेदन योजनांच्या लाभासाठी
उत्पन्न मर्यादा वाढवा
गडचिरोली,
ग्रामीण तथा शहरी भागात राहणाऱ्या गोरगरीब, निराधार महिलांचे संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना तथा श्रावण बाळ योजनेला लागणारी उत्पन्नाची मर्यादा 21 हजारांवरुन 45 हजार करण्यात यावी या मागणीसह विविध मागण्यांचे निवेदन रायुकाँ विधानसभा अध्यक्ष रुपेश वलके यांनी आ. धर्मरावबाबा आत्राम यांना सादर केले.
निवेदनात म्हटले आहे की, सन 2022- 23 मधील 50 हजाराच्या आत उत्पन्न मर्यादा असलेल्या अन्न सुरक्षा प्राधान्य बनलेले सर्व रेशन कार्ड धारकांना रेशन
कार्डवर धान्य देण्यात यावे, ग्रामीण तसेच शहरी भागातील घरगुती सिलेंडर पोहचवर गॅस एजन्सीधारकांकडून होणारी लूट तत्काळ थांबवून संबंधित एजन्सी धारकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे, नोव्हेंबर महिन्यांपासून वितरीत मोफत धान्याचे कमिशन महिनाभरात अदा करावे, वाढती लोकसंख्या लक्षात घेता जिल्ह्यात तिसऱ्या गॅस एजन्सीला मंजूरी द्यावी, कारोनात तसेच वाघाच्या हल्ल्यात मृत पावलेल्या प्रत्येक कुटुंबाला तत्काळ अंत्योदय कार्ड देण्यात यावे, गडचिरोली तालतुक्यातील रेशन कार्डाची ऑनलाइन कामे जलद गतीने करण्यात यावी, नवीन रेशन कार्ड धारकांना धान्य देण्यात यावे, प्रधानमंत्री उज्वला योजनेचे मंजूर गॅस कनेक्शन न देणाऱ्या गॅस एजन्सीविरुद्ध तत्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी रूपेश वलके यांनी आ. धर्मरावबाबा आत्राम यांना निवेदनातून केली आहे.
0 Comments