कमी वजनाचे पोते दुकानदारांच्या माथी रेशनच्या थेट वाहतुकीचा गडचिरोलीत बसतोय फटका

कमी वजनाचे पोते दुकानदारांच्या माथी रेशनच्या थेट वाहतुकीचा गडचिरोलीत बसतोय फटका


गडचिरोली,

गडचिरोली शहरातील २८ स्वस्त धान्य दुकानांमध्ये थेट वाहतूक सुरू करण्यात आली आहे; मात्र प्रत्येक पोत्यात एक ते दोन किलो कमी धान्य राहत असल्याने धान्याची तूट वाढून याचा फटका रेशन दुकानदारांना बसत आहे.

राईस मिलच्या गोदामातून निघालेले धान्य तालुकास्तरावरील गोदामांत साठविले जाते. या ठिकाणी प्रत्येक पोत्याचे वजन केले जाते. वजनापेक्षा धान्य कमी असेल तर तेवढे पैसे संबंधित मिल मालकाकडून कमी केले जातात. यामुळे राईस मिलधारक प्रशासनाची फसवणूक करू शकत नाही; मात्र या प्रक्रियेमुळे राईस मिलच्या गोदामातून निघालेले धान्य तालुकास्तरावरच्या गोदामांत साठविले
जाते. त्यानंतर रेशन दुकानदारांकडे नेले जाते. यामध्ये रेशन धान्याची चढाई व उतराईसाठी दुप्पट खर्च येतो; तसेच आहे.
गोदामापर्यंत धान्य ने-आण करणे यात वाहतुकीचा खर्च वाढते. ही बाब लक्षात घेऊन शहरातील रेशन दुकानांमध्ये थेट वाहतूक करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये गोदामातून निघालेले धान्य थेट रेशन दुकानात नेले जाते. प्रत्येक पोत्याचे वजन करून घेणे ही संबंधित रेशन दुकानदाराची जबाबदारी आहे; मात्र काही रेशन दुकानदारांकडे ५० किलो वजनाचे काटे नाहीत; तसेच माल उतरविण्यासाठी हमाल घाई करीत असल्याने प्रत्येक पोते मोजणे शक्य होत नाही. याचा गैरफायदा घेतला जात आहे. काही पोत्यांमध्ये एक ते दोन किलो धान्य कमी येत आहे. एका दुकानदाराला ५० ते ६० किलो धान्य कमी मिळत आहे. शेवटच्या लाभार्थीला धान्य मिळत नसल्याने अडचण झाली

थेट वाहतूक पद्धतीमध्ये शासनाचा वाहतूक खर्च वाचत असला तरी रेशन दुकानदारांची फसवणूक होते. धान्य कमी मिळाल्याने शेवटच्या लाभार्थीला धान्य मिळत नाही. अशावेळी लाभार्थी दुकानदाराला जबाबदार धरून त्याच्याविरोधात पुरवठा विभागाकडे तक्रार करतात. पुरवठा विभाग रेशन दुकानदारावर कारवाई करते; मात्र थेट वाहतुकीचा दोष आहे, हे समजून

घेत नाही. थेट वाहतूक बंद करावी. - रुपेश वलके, रायुकों, गडचिरोली विधानसभा अध्यक्ष

Post a Comment

0 Comments