नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीत जनतेच्या अपेक्षांचा नवा किरण म्हणून प्रणोती सागर निंबोरकर (भांडेकर)

नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीत जनतेच्या अपेक्षांचा नवा किरण म्हणून प्रणोती सागर निंबोरकर (भांडेकर)
-रितेश वासनिक-
गडचिरोली,
नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीत जनतेच्या अपेक्षांचा नवा किरण म्हणून प्रणोती सागर निंबोंरकर (भांडेकर) या जनतेच्या उमेदवार म्हणून पुढे आल्या आहेत. उच्च शिक्षित, समाजाभिमुख आणि लोकहिताच्या कार्यात सदैव सक्रिय असलेल्या प्रणोती यांनी आजवर अनेक सामाजिक उपक्रमांतून सामान्य जनतेचा आवाज बनून दाखवला आहे.
"नवा चेहरा, नवी उमेद, आणि हक्कासाठी लढणारी नवी ताकद” या घोषवाक्यासह त्या नगर परिषद अध्यक्ष पदासाठी जनतेसमोर उभ्या राहत आहेत.
स्थानिक समस्यांवर ठोस उपाय, पारदर्शक कारभार आणि महिलांसह तरुणांसाठी संधी निर्माण करण्याचा त्यांचा संकल्प आहे. त्यांचे उद्दिष्ट – “जनतेचा विकास हा राजकारणाच्या केंद्रस्थानी असावा" हे त्यांच्या प्रत्येक कार्यातून दिसून येते.
जनतेने स्वतःहून तयार केलेल्या या उमेदवारीला समाजातील सर्व स्तरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. नागरिकांच्या विश्वासाने प्रेरित झालेल्या प्रणोती निंबोंरकर या "लोकांचा आवाज, लोकांसाठीची निवड" म्हणून एक मजबूत पर्याय ठरत आहेत .लोक कल्याण, गरजूंना मदतीला धावून जाण्याची इच्छा असल्याले लोक नेते आणि धार्मिक कार्यक्रम मध्ये सत्ता निंबोंरकर परिवार सहभागी होऊन जातात आणि त्यांच्या बरोबर राहून कोणत्याही गोष्टीचा विचार न करता आपले सेवा भावी काम जनतेच्या हिताचे काम करीत असतात. आज गडचिरोली नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीत जनतेच्या अपेक्षांचा प्रणोती सागर निंबोंरकर  सर्व लक्ष यांच्या कडे लागले आहे .

Post a Comment

0 Comments