पोलीस मुख्यालय गडचिरोली येथे पार पडला मद्यमुक्ती
सेमीनार
गडचिरोली,
गडचिरोली पोलीस दलातील अधिकारी अंमलदार हे मद्यापासुन दुर रहावेत याकरिता “अल्कोहोलिक्स अॅनानिमस आंतरसमूह” गडचिरोली या संघटनेतर्फे व्यसनमुक्ती सेमीनार आज दि.०२/०६/२०२३ रोजी एकलव्य हॉल पोलीस मुख्यालय गडचिरोली येथे पार पडला.
या सेमीनार मध्ये अल्कोहोलिक्स अॅनानिमस या संघटनेचे पदाधिकारी व सदस्य यांनी उपस्थित अधिकारी अंमलदार यांना स्वानुभव आपल्या मनोगतातून सांगितले. दारूचे व्यसन कशाप्रकारे आपल्याला शारीरीक, मानसिक व आर्थिक अधोगतीकडे घेवुन जाते व शेवटी भयंकर परिणामाला सामोरे जावे लागतात. तसेच दारुच्या व्यसनामुळे व्यक्तीची कशाप्रकारे कौटुंबिक, सामाजिक दुर्दशा होते, हे सेमीनारच्या माध्यमातुन सांगण्यात आले. या सेमीनारसाठी २०० अधिकारी अंमलदार उपस्थित होते.
हा कार्यक्रम मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा., मा. अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. अनुज तारे सा., मा. अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. कुमार चिंता सा., मा. अपर पोलीस अधीक्षक अहेरी श्री. यतिश देशमुख सा., यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस उप-अधीक्षक (गृह) श्री. अजय अहीरकर यांच्या उपस्थितीत पार पडला. याप्रसंगी अल्कोहोलिक्स अनॉनिमस संघटनेचे श्री. संजय जे, श्री. जीवन एम, श्री. लक्ष्मण टी, श्री. प्रभाकर बी. व सर्व सभासद उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी पोलीस कल्याण शाखेतील प्रभारी अधिकारी श्री. नरेंद्र पिवाल व अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले.
0 Comments