ओरीसा मधे रेल्वे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या नागरीकांना आप तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली


ओरीसा मधे रेल्वे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या नागरीकांना आप तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली


गडचिरोली  - आम आदमी पार्टी जिल्हा गडचिरोली तर्फे ओरीसा मधे रेल्वे अपघातात 300 हुन अधिक मृत्युमुखी पडलेल्या सर्व नागरिकांना बाळकृष्ण सावसाकडे जिल्हा संयोजक गडचिरोली जिल्हा यांच्या नेतृत्वाखाली भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली मौन धारन करुन कॅडल मार्च काढण्यात आली इंदिरा गांधी चौक विश्रामगृहातु कॅडल मार्चला सुरवात करण्यात आली या भीषन अपघाताची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी आम आदमी पार्टीने मागणी केली आहे. यावेळी स्वराज्य यात्रेमध्ये सहभागी जिल्हा संयोजक जिल्हा सचिव यांनी कार्यकर्त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करुन मौन पद यात्रा यशस्वी केली.यावेळी उपस्थित संजीव जिवतोडे जिल्हा संघटन मंत्री, डॉ देवेंद मुनघाटे शेतकरी आघाडी अध्यक्ष, मिनाक्षी खरवडे जिल्हा महिला संयोजक,दिपीका गोवर्धन जिल्हा महिला संघटन मंत्री,सोनल नन्नावरे जिल्हा महिला युवा संयोजक, संतोष कोटकर जिल्हा ओ.बी.सी.आघाडी अध्यक्ष,
नामदेव पोले शहर संयोजक, हितेंद्र गेडाम कामगार आघाडी अध्यक्ष, गणेश त्रिमुखे जिल्हा सह सचिव,दिवाकर साखरे जिल्हा सदश्य,मनोज गोवर्धन,उराडे इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments