मोदी -9 महा जनसंपर्क अभियानाअंतर्गत इंदिरानगर येथील अंगणवाडी सेविकांचा सन्मान - योगीताताई पिपरे

मोदी -9 महा जनसंपर्क अभियानाअंतर्गत इंदिरानगर येथील अंगणवाडी सेविकांचा सन्मान

भाजप महिला आघाडीचा उपक्रम


गडचिरोली :-
मोदी -9 महा जनसंपर्क अभियाना अंतर्गत भाजप महिला आघाडी जिल्हा गडचिरोली च्या वतीने आज दि. 13 जून रोजी भाजप महिला आघाडीच्या जिल्हा प्रभारी योगीताताई पिपरे यांच्या नेतृत्वात महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी इंदिरानगर येथील आंगणवाडी केंद्र क्र. 8 ला भेट दिली . व उत्कृष्ट सेवा देणाऱ्या अंगणवाडी सेविका अरुणा भुरसे  यांचा सन्मान केला. तसेच अंगणवाडी  केंद्रा अंतर्गत लहान मुले व स्तनदा माता यांची भेट घेऊन पोषण आहाराबाबत माहिती जाणून घेतली. तसेच केंद्र सरकारच्या योजनेच्या लाभार्थी महिलांची भेट घेऊन मिळणाऱ्या लाभाबाबत माहीती जाणून घेतली.
      यावेळी माजी नगराध्यक्ष तथा जिल्हा प्रभारी योगीताताई पिपरे यांनी ९ वर्षात मोदी सरकारने केलेल्या विकास कामाची तसेच जनहितार्थ लोककल्याणकारी योजनांची माहिती त्यांना  दिली.
   यावेळी भाजप महिला आघाडी च्या जिल्हा प्रभारी योगीताताई पिपरे, शहर अध्यक्ष कविताताई उरकुडे, पूनम हेमके व महिला पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments