पोटगाव ग्रामपंचायत येथे गाव विकास आढावा बैठक गावातील प्रत्यक्ष अडचणी पाहून विकास आराखडा व्हावा- आमदार कृष्णा गजबे

पोटगाव ग्रामपंचायत येथे गाव विकास आढावा बैठक 
 गावातील प्रत्यक्ष अडचणी पाहून विकास आराखडा व्हावा- आमदार कृष्णा गजबे  देसाईगंज,
     गाव विकास आराखडा गावातील प्रत्यक्ष अडचणी पाहून व्हावा. स्थानिक ग्रामस्थ व पदाधिकाऱ्यांचा त्यात मोठा सहभाग असावा तसेच शासकिय योजनांचा लाभ नागरिकांना मिळण्यासाठी ग्रामपंचायतींनी प्रयत्न करावेत. असे आवाहन आमदार कृष्णा गजबे यांनी केले.
     देसाईगंज तालुक्यातील पोटगाव येथील ग्रामपंचायत येथे दिनांक. 11 मे 2023 रोजी   "गाव विकास" आराखडा आढावा बैठकीवेळी ते बोलत होते.
     यावेळी आमदार कृष्णा गजबे, विजयजी डडमल सरपंच, पंकज वंजारी उपसरपंच, देशमुखजी ग्रामसेवक, चंदूजी रणदिवे तंटामुक्ती अध्यक्ष, तुकाराम मेश्राम तंटामुक्ती उपाध्यक्ष, ममताताई गजबे ग्रा.पं. सदस्य, उर्मिलाताई  राऊत ग्रा.पं. सदस्य, अशोक गजभिये ग्रा.पं. सदस्य, लताताई आंबेडारे ग्रा.पं. सदस्य, तानाताई मेश्रामग्रा.पं. सदस्य, किरण बनसोड, महेंद्र सोनपिपरे,  विनायक धारगाये, पी. टी. दोंनाडकर नानाजी कुथे आणि समस्त उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments