गडचिरोली तालुक्यातील मौशिखांब-मुरमाडी जि.प. क्षेत्रातील मौशिखांब येथे संत नरहरी महाराज व विठ्ठल मुर्तीची प्राणप्रतिष्ठाउद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांचे प्रतिपादन.


गडचिरोली,
महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. आपल्या माय मराठी भूमीत अनेक थोर संतांनी जन्म घेतला. संतानी समाजाला प्रबोधनात्मक उपदेश देऊन सर्वधर्मसमभावनेची शिकवण दिली. त्यापैकी एक म्हणजे सोनार समाजात जन्म घेतलेले संत नरहरी महाराज होत. संत नरहरी महाराजांनी आपले जीवन समाजकार्यासाठी वेचले. समाज एकसंघ होऊन समाजाचा विकास झाला पाहीजे, यासाठी त्यांनी आपल्या अभंगवाणीतून प्रबोधनात्मक कार्य केले. संताची शिकवण व विचार हे प्रत्येक समाजाने आत्मसात करून आपल्या जीवनाची वाटचाल केली पाहीजे, असे प्रतिपादन उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांनी केले.
गडचिरोली तालुक्यातील मौशिखांब-मुरमाडी जि.प. क्षेत्रातील मौशिखांब येथे सोनार समाजाच्या वतीने संत नरहरी महाराज मंदिरात संत नरहरी महाराज व विठ्ठल मुर्तीची प्राणप्रतिष्ठा व अभिषेक सोहळा नुकताच पार पडला. या कार्यक्रमाला अरविंदभाऊ कात्रटवार यांनी उपस्थिती दर्शवून भगवान विठ्ठल व संत नरहरी महाराज यांच्या मुर्तीची पुजा, आरती केली. मुर्ती प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमानिमित्य सोनार समाजाच्या वतीने गोपाल काला व भोजनाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता.
अरविंदभाऊ कात्रटवार पुढे म्हणाले की, संतांनी आपल्या विचाराची समाजाला मोठी देणगी दिली आहे. कोणताही समाज लहान-मोठा नसतो. केवळ संकुचीत विचारच सामाजिक वातावरण कलुषीत करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे आपले विचार व वाणी ही निकोप व प्रेमभावना निर्माण करणारी असली पाहिजे. तेव्हाच समाजातील मतभेद दूर होऊन समाजामध्ये शांतता प्रस्थापित होईल आणि समाजातील प्रत्येक घटकाचा विकास होईल. यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने योगदान देण्याची गरज आहे, असे कात्रटवार म्हणाले. मौशीखांब- मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रातील प्रत्येक गावांचा आणि समाजातील प्रत्येक घटकांचा विकास झाला पाहीजे, यासाठी आपली वाटचाल सुरू असून माझ्या प्रयत्नामुळे अनेक विकासात्मक समस्या मार्गी लागली आहे. या क्षेत्राच्या विकासासाठी मी सदैव तत्पर असल्याचे अरविंदभाऊ कात्रटवार म्हणाले.
संत नरहरी सोनार महाराज व भगवान विठ्ठल मुर्ती प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाला उप तालुका प्रमुख यादवजी लोहंबरे, नानाजी काळबांधे, अमित बानबले, संदिप भुरसे, संजय बोबाटे, प्रशांत ठाकुर, संदिप आलबनकर, सुरज उईके, नवनाथ ऊके, दिपक लाडे, नरेश कुकडकार, अंबदास मुनघाटे, त्र्यंबक फुलझेले, भाऊराव नन्नावरे, रत्नाकर रंधये, संदिप टेंभुर्णे, उमाजी चनेकार, वसंत आभारे, रमेश सिडाम, देवीदास चनेकार, मयुर भोयर, महेश लाजुरकर, अंकुश झाडे, पंकज चनेकार, खुशाल मेश्राम, प्रांजल कोलते, पराग कुमरे, उमाजी लाजुरकर, पुरुषोत्तम चनेकार, दुर्वेश मुनघाटे, सुभाष देशमुख, रुपेश आजबले, भाऊराव मुनघाटे, गुरुदेव गोहणे, कुणाल पेंदाम, दिलीप वेलादी, निकेश मडावी, अमर निंबोड, अमित हुलके, राहुल मडावी, भक्तदास खेवले, सुरज टेकाम, गुरुदेव सेलोटे, कवडूजी धंदरे, गणेश खेवले, सचिन भरणे, कैलास फुलझेले, वामन भरणे, रमेश आवारी, उमाकांत हर्षे, धनवान लडके, हरिदास हर्षे, धनंजय खेडेकर, हिरामण कोसमशिले, रवि हर्षे, सोनुजी सिडाम, नितू हर्षे, विजय भरणे, एकनाथ हर्षे, मोरेश्वर शेरकी, सुरज ठुसे, मोतीराम उंदिरवाडे, श्रेयस भानारकर, शिवसान बुरेवार, गजानन सिडाम, अधीन शेख, दिनेश नन्नावरे, बालाजी वाकडे, गोपाल हजारे, सिद्धार्थ सोरते, गोकुळ नागापूरे, बालाजी बाबनवाडे, ताराचंद चुधरी, चेतन नागरे, खुशाल ढोलणे, सौरव कुरुडकार, राजु जवादे, विनायक कुरुडकार, अजय ठाकरे, मोहन करकाडे, आशिष ठाकरे, करण मुरतेली, उत्तम ठाकरे, निलेश ठाकरे, देवेंद्र मुरतेली, गणेश ठाकरे, आकाश मुंडरे उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments