बोळधा येथे संरक्षण भिंत आणि मीटिंग हॉलचे आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते लोकार्पण

बोळधा येथे संरक्षण भिंत आणि मीटिंग हॉलचे आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते लोकार्पण
देसाईगंज/बोळधा:
     देसाईगंज तालुक्यातील बोळधा येथे बौद्ध समाज यांच्या वतीने बुद्ध पौर्णिमा कार्यक्रमाचे आयोजन केलेले होते. या कार्यक्रमाला आमदार कृष्णा गजबे हे उपस्थित राहून बुद्ध पौर्णिमा निमित्त तथागत गौतम बुद्ध व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण व दीप प्रज्वलित करून अभिवादन केले.  तसेच समस्त जनतेला बुद्ध पौर्णिमा निमित्त शुभेच्छा दिल्या. 
    बुद्ध पौर्णिमा निमित्त बोळधा येथील बौद्ध समाज येथे संरक्षण भिंत आणि मीटिंग हॉलचे लोकार्पण आमदार कृष्णा गजबे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.   
        कार्यक्रमाप्रसंगी आमदार कृष्णा गजबे, मोहन पाटील गायकवाड मा सभापती, उईके सर मा.पं.स सभापती, केवळरामजी झोडे पाटिल, भाग्यश्रीताई गायकवाड सरपंच, राजू पाटील गायकवाड उपसरपंच, पोलीस पाटील खुशालजी मस्के, तंटामुक्ती अध्यक्ष दिलीपजी साखरे, जयेशजी साखरे, मंदाताई लंजे, पुरुषोत्तम नेवारे ग्रापं सदस्य, राजेंद्रजी नाकाडे ग्रापं सदस्य, वर्षाताई शिंदे ग्रापं सदस्य, जयश्रीताई रामटेके ग्रापं सदस्य, भगवानजी गायकवाड माजी उपसरपंच, वर्षाताई शिंदे ग्रापं सदस्य, सिद्धार्थजी लाडे तंटामुक्ती उपाध्यक्ष, पितांबरजी गायकवाड शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, नाकाडेजी ग्रामसेवक,  आसलवारजी वनरक्षक, बौद्ध अनुयायी व गावातील नागरिक  मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments