कोनसरी ग्रामपंचायत मधील बेरोजगारानी लायड्स मेटल अँड एनर्जी लिमिटेड कंपनीला सहकार्य करावे,तसेच परिसरातील इतर ग्रा. प. ने मोर्चे किंवा आंदोलन करु नये.

कोनसरी ग्रामपंचायत मधील बेरोजगारानी लायड्स मेटल अँड एनर्जी लिमिटेड कंपनीला सहकार्य करावे,तसेच परिसरातील इतर ग्रा. प. ने मोर्चे किंवा आंदोलन करु नये.




कोंसरी
आजमितीला कोनसरी लोह प्रकल्पात अनेक मुदयावरती वाद निर्माण होत आहे. परंतु ज्या वेळेस लायड्स मेटल अँन्ड एनर्जी लिमिटेड या कंम्पणीला प्रकल्पासाठी जागा हवी असता आजुबाजुच्या गावाणी जेव्हा जमिनीचे रेठ दहा ते पंधरा लाख रुपये एकर या प्रमाणे मागणी केली अशा वेळेस हा प्रकल्प आपला क्षेत्र सोडता इतर कुठल्याही क्षेत्रात जाऊ नये व आपल्या क्षेत्रातील बेरोजगाराणा रोजगार मिळवा या उद्देशाने कोनसरी गावातील शेतकऱ्यांनी कंम्पनीने बोललेल्या रेट प्रमाणे म्हजेच पाच लाख रुपये प्रती एकर या दरात कंम्पणीला जमिन दिल्या तेव्हा कुठे हा प्रकल्प कोनसरी गावात उभा राहीला. आता जेव्हा रोजगार निर्माण होत आहे, केव्हा भुमिधारक शेतकरी व गावातील स्थानिक बेरोजगार यांना आतापर्यंत फक्त 20% टक्के रोजगार प्राप्त झालेला आहे. व कंम्पनीचे एकीही युनिट सुरु झालेले नाहीत. अशा वेळेस गावातील प्रकल्प ग्रस्त बेरोजगार रोजगार मिळेल या आशेने वाट बघत असतांना कोनसरी परिसरातील इतर ग्रामपंचायतीने कंपनी विरोधात आताच मोर्चे किंवा आंदोलन कारणे योग्य नाही, तरी कोनसरी ग्रामपंचायत कडुन, आपणास विनंती आहे की, असा कुठलाही प्रकार करू नये, आम्ही तुमच्या विरोधात नाही सोबत आहोत आणि आपल्याही ग्रामपंचायतीच्या. बेरोजगारांना रोजगार मिळावा अशी आमची ठाम भूमिका आहे. तरी सुधा आपल्या गावातील स्कील बेस बेरोजगारांना किंवा लेबर म्हणून (सप्लार्य) मध्ये काम करणारे बेरोजगारासाठी कोनसरी ग्रामपंचायतीने कुठलेही प्रकारचे बंधन घातलेले नाही. आणी इतर आजूबाजूच्या ग्रामपंचायत मधून प्रकल्पात 70% टक्के लेबर काम करीत आहेत अशा परिस्थीती मध्ये कोनसरी ग्रामपंचायत मधील बेरोजगारांचा हक्क हिरावुन कंपणीवर मोर्चा स्वरूपात दबाव आणने हे कितपत बरोबर आहे. आपणच विचार करावा. आज कोनसरी ग्रामपंचायतीने नागरीकाच्या उपस्थीती मध्ये ठराव घेऊ असे म्हटले आहे की, जर आपण मोर्चा करीत असाल तर नायलाजाने आपल्या आम्हाला विरोधात उभे राहावे लागेल. तरी आपल्या जवळपासच्या गावागावातील आपले संबंध खराब होणार नाही व तनाव वाढणार नाही याची काळजी घेण्यात यावी. कोनसरी ग्रामपंचायत आपल्या सहकार्याच्या भूमिकेत आहे.

Post a Comment

0 Comments