जारावंडी गावात तळसचा थरकाप; चार ग्रामस्थांवर हल्ला, गावात भीतीचे वातावरण
एटापल्ली,
एटापल्ली तालुक्यातील जारावंडी गावात तळस या हिंस्र प्राण्याने थैमान घालून चार ग्रामस्थांवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या हल्ल्यात दोन महिला गंभीर आणि दोन पुरुष जखमी झाल्या असून, एका महिलेचा हाताची तीन बोटे पूर्णतः तुटलेली आहेत. ही घटना शनिवारी दि 2, सकाळी 9 वाजता च्या सुमारास घडली असून, संपूर्ण गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.
हल्ल्यात जखमी झालेल्यांची नावे
शालू महेश वाढई (वय ३५) रा.जारावंडी डाव्या हाताची तीन बोटं पूर्णपणे तोडली गेली आहेत.
पौर्णिमा उमेश शेडमाके (वय ४५) रा,जारावंडी गंभीर जखमी.
गणेश चरणदास भोयर (वय ३५) रा,जारावंडी,गंभीर जखमी.
किसन पुरमशेटीवार (रा. आष्टी, वय ४०) गंभीर जखमी. सदर व्यक्ती जर्मनी भांडे विकण्यासाठी गावात आला होता
सदर दोन महिला शेतावर जात असताना, रस्त्यात अचानक तळस प्राण्याने हल्ला चढवला. ग्रामस्थांच्या सांगण्यानुसार, तळस अत्यंत आक्रमक होता व कुठलाही उचकावाही न करता सरळ झडप घालत होता. गावकऱ्यांनी आरडाओरड करून प्राण वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत चारही व्यक्ती जखमी झाल्या होत्या.
तळस प्राण्याने गावातील काही बैलांवरही हल्ला केला असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे फक्त माणसेच नाही, तर जनावरांचाही जीव धोक्यात आहे.
हल्लेखोर तळस प्राणी मृत अवस्थेत आढळला; वनविभागाने पंचनामा करून केला अंत्यविधी
घटनेनंतर काही तासांच्या आत, ग्रामस्थांच्या लक्षात आले की हल्ला करणारा तळस प्राणी रस्त्याच्या कडेला मृत अवस्थेत आढळून आला. ही माहिती मिळताच गावकऱ्यांनी तात्काळ वनविभागाला कळवले, आणि काही वेळातच वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. अधिकाऱ्यांनी पंचनामा करून प्राण्याचे शव तपासणीसाठी (छावविच्छेदन) केले. पशुवैद्यकीय तपासणीनंतर नियमित प्रक्रियेनुसार सदर प्राण्याचे अंत्यदहन करण्यात आले. या प्रक्रियेमुळे गावकऱ्यांमध्ये थोडाफार दिलासा मिळाला असला, तरी घटनेची तीव्रता लक्षात घेता सावधगिरी व सुरक्षेचा मुद्दा अधिक गंभीरतेने घेण्याची गरज अधोरेखित झाली आहे.
जखमी नागरिकांना नुकसानभरपाई देण्याची ग्रामस्थांची जोरदार मागणी
जारावंडी गावात तळस प्राण्याने केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या नागरिकांणा नुकसानभरपाई देण्याची मागणी होत आहे. जखमीत शालू महेश वाढई यांची तीन बोटं तुटली असून, इतर जखमींनाही मोठ्या प्रमाणात गंभीर दुखापत झाली आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तात्काळ आर्थिक मदतीची आणि नुकसानभरपाईची मागणी केली आहे. हा प्रकार नैसर्गिक आपत्तीच्या स्वरूपाचा असल्याने वन विभागामार्फत आर्थिक मदत जाहीर करण्यात यावी, अशी जोरदार मागणी नागरिकाणकडून होत आहे. प्रशासनाने मानवी जिवित व मालमत्तेच्या नुकसानाची गंभीर दखल घेऊन त्वरित मदतीचा निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
0 Comments