गडचिरोली येथे देशोन्नतीचा ‘मनस्विनी' भव्य श्रावणी महोत्सव उत्साहात साजरा. लोकप्रिय खासदार डॉ. नामदेव किरसान यांचे हस्ते उदघाटन सोहळा संपन्न
गडचिरोली :
गडचिरोली शहरात देशोन्नतीच्या "मनस्विनी" द्वारा आयोजित भव्य श्रावणी महोत्सवाचे उदघाटन गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार डॉ. नामदेव किरसान यांचे हस्ते व प्रसिद्ध गायिका श्रेया खराबे यांचे प्रमुख उपस्थितीत पार पडला.
यावेळी मनस्वीनां विविध क्षेत्रात प्रविण्य प्राप्त केल्याबद्दल पुरष्कार वितरित कारण्यांत आले.
खासदार डॉ. किरसान यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “श्रावणी महोत्सव हा सामाजिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक मूल्ये जपणारा उत्सव आहे. या माध्यमातून समाजात एकात्मता, सद्भावना आणि संस्कृतीचे जतन करण्यास मोठा हातभार लागतो.
या प्रसंगी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष महेंद्रजी ब्राह्मणवाडे, शहराध्यक्ष सतीश विधाते, जिल्हाध्यक्ष महिला काँग्रेस गडचिरोली कविताताई महोरकर, तनुरश्रीताई आत्राम, मनस्विनी प्रमुख अनिल धामोडे, सुलभाताई धामोडे, कुसुमताई आलाम, वैशाली विधाते, श्रेया खराबे, माजी नागराध्यक्ष योगिताताई पीपरे, सोनलताई कोवे, ज्योती देवकुले, शितल सोमनानी, वैभवी होकम, वैशालीताई नरोटे, संपूर्ण मनस्वीनी सदस्य तसेच विविध पदाधिकारी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments