डॉ.एस.आर.रंगनाथन यांची जयंती साजरी.
भामरागड -
राजे विश्वेश्वरराव कला- वाणिज्य महाविद्यालय येथे सरस्वती माता,राजे विश्वेश्वरराव महाराज व डॉ.एस.आर.रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. चिन्ना चालुरकर प्रमुख पाहुणे डॉ.संतोष डाखरे , डॉ.कैलास निखाडे होते. प्रमुख उपस्थिती संजय खंडारकर,सौ.मजुषा गावंडे, शैलेश गावडे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथपाल विनायक मोराळे यांनी केले. प्रमुख पाहुणे डॉ संतोष डाखरे यांनी मोबाईलचा वापर कमी करून विद्यार्थीनी जास्तीत जास्त वेळ ग्रंथालय मध्ये घालविला पाहिजे असे प्रतिपादन केले.तर कैलास निखाडे यांनी डॉ.एस.आर.रंगनाथन यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला.संजय खंडारकर यांनी ग्रंथ वाचले पाहिजे व ज्ञानात वाढ केली पाहिजे असे सांगितले.तर सौ.मंजुषा गावंडे यांनी वाचन केल्यामुळे व्यक्ती कशी मोठी होतात याची उदाहरणे देऊन डॉ.आंबेकर यांनी सतत वाचन केल्यामुळे राज्यघटना लिहू शकले,ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या सतत वाचनाच्या सवयीमुळे शास्त्रज्ञ झाले. अध्यक्षीय भाषणात प्रा. चिन्ना चालुरकर यांनी ग्रंथालय आणि रंगनाथन यांचे जवळचे नाते होते हे स्पष्ट केले.फार मोठं योगदान ग्रंथालयासाठी डॉ रंगनाथन यांनी दिले असे प्रतिपादन केले. मान्यवरांच्या हस्ते ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन करुन ग्रंथ - प्रदर्शन सर्वांसाठी खुले करण्यात आले. विद्यार्थ्यांनी ग्रंथ- प्रदर्शनाचा लाभ घेऊन समाधान व्यक्त केले. कार्यक्रमांचे सुत्र संचालन ग्रंथपाल विनायक मोराळे व आभारप्रदर्शन प्रा.विशाल तावेडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी बंडु बोंडे, सुनिल ताजणे यांनी परिश्रम घेतले.
0 Comments