एटापल्ली शहरात भव्य दहीहंडी उत्सवाचा उत्साह
श्रीकृष्ण स्पोर्टिंग क्लब मरपल्ली ठरला दहीहंडीचा विजेता
शशांक नामेवार तालुका प्रतिनिधि एटापल्ली.
एटापल्ली: येथे दहीहंडी उत्सव समिती एटापल्ली आणि लॉयड्स मेटल अँड एनर्जी लिमिटेड कंपनी सुरजागड यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद हायस्कूलच्या भव्य पटांगणात एका शानदार दहीहंडी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे विशेष सहकार्य लाभलेले भोलुभाऊ सोमनानी यांच्या मार्गदर्शनाखाली दहीहंडी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होत
या दहीहंडी उत्सवाला एटापल्ली शहरासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे उद्घाटन लॉयड्स मेटल कंपनीचे अजय चव्हाण, एटापल्ली पोलीस स्टेशनचे निरीक्षक मच्छिंद्र नागरगोजे, राजगोपाल सुल्वावार आणि विलास चिटमलवार यांच्या हस्ते श्रीकृष्णाच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले.
या दहीहंडी स्पर्धेत एकूण १० संघांनी भाग घेतला.चुरशीच्या स्पर्धेत सर्वच संघानी थर लावून दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न केला.परंतु श्रीकृष्ण स्पोर्टिंग क्लब मरपल्ली या संघाने प्रथम क्रमांक पटकावला आणि त्यांना विजेतेपद मिळाले.विजेत्या संघाला रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले. सहभागी झालेल्या इतर ९ संघांनाही प्रोत्साहनपर बक्षीस देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राघवेंद्र सुल्वावार,राहुल कुळमेथे,प्रसाद नामेवार,संतोष गंधेशिरवार,नामदेव हिचामी, जनार्धन नल्लावार आणि राकेश तेलकुंटलवार उपस्थित होते.
या यशस्वी दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यासाठी संपत पैडाकुलवार,अनिकेत मामीडवार,महेंद्र सुल्वावार, ओमकार मोहूर्ले,आदित्य चिप्पावार,अंकित दिकोंडावार, रोशन सोनी,उमेश संगर्थी,तेजस गुज्जलवार,डॉ.रमेश मेश्राम, सुरज मंडल,राकेश हिरा आणि रोहित बोमकंटीवार यांच्यासह अनेक सदस्यांनी विशेष मेहनत घेतली.
कार्यक्रमाच्या शेवटी उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम, पोलीस निरीक्षक मच्छिंद्र नागरगोजे,नगरसेवक राघवेंद्र सुल्वावार,राहुल कुळमेथे आणि संपत पैडाकुलवार यांच्या हस्ते विजेत्या संघांना बक्षिसे प्रदान करण्यात आली.
यावेळी उपस्थित सर्व नागरिकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.हा दहीहंडी उत्सव एटापल्लीवासियांसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरला.
0 Comments