आज राष्ट्रीय महामार्गावर खड्ड्यांमध्ये धान रोवणी करून प्रशासनाचा निषेध करणार :-सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांचा इशारा
राष्ट्रीय महामार्ग 353 सी च्या दयनीय अवस्थेविरोधात नागरिकांचे अनोखे आंदोलन होणार
गडचिरोली:
राष्ट्रीय महामार्ग 353 सी च्या अत्यंत खराब अवस्थेमुळे त्रस्त झालेल्या जनता 18 आगस्ट रोजी सकाळी 10 वाजता जिमलगट्टा फाटा येथे प्रशासनाचा निषेध करत अनोखे आंदोलन करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. रस्त्यावरील मोठमोठे खड्डे बुजविण्यास प्रशासनाला आलेले अपयश दाखवून देण्यासाठी संतप्त नागरिकांनी या खड्ड्यांमध्ये चक्क धानाचे रोपटे आणि वृक्षारोपण करण्यात येणार आहे.आंदोलनाचे नेतृत्व सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार करणार आहेत असे त्यांनी आज सांगितले आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून या महामार्गाची दुरवस्था झाली असून, वाहनचालक आणि स्थानिक रहिवाशांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. खराब रस्त्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे संतप्त होऊन नागरिकांना घेऊन सदर आंदोलन उभारणार असल्याचे त्यांनी आज माध्यमांना सांगितले आहे.
0 Comments