मत चोरी विरोधात काँग्रेस जिल्हाभरात राबवणार स्वाक्षरी अभियान ; 14 ऑगस्ट रोजी गडचिरोली शहरात काढणार कॅण्डल मार्च

मत चोरी विरोधात काँग्रेस जिल्हाभरात राबवणार स्वाक्षरी अभियान ;  14 ऑगस्ट रोजी गडचिरोली शहरात काढणार कॅण्डल मार्च
गडचिरोली :: लोकसभेतील विरोधी पक्षनेते तथा काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते मा. खा. श्री. राहुलजी गांधी यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून, मतदार यादीमध्ये मोठ्या प्रमाणात झालेले घोटाळे उजेडात आणले आहेत. 
भारतीय जनता पक्षाने निवडणूक आयोगावर दबाव टाकून, निवडणूक आयोगाच्या मदतीने, मतदार यादीमध्ये घोटाळे करून, मतचोरी करून, गैरमार्गाने सता मिळवलेली आहे. काँग्रेस पक्ष या विरोधात सातत्याने लढा देत आहे. मतचोरी करून गैरमार्गाने सता मिळविणे हा विषय केवळ राजकीय नसून सर्वसामान्य मतदारांनी केलेल्या मतदानाचा अपमान करणारा आहे. मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर घोटाळे करण्यात आले याची जाणीव आता सर्वसामान्य मतदारांनाही झालेली आहे. भारतीय जनता पार्टी च्या दबावाखाली येऊन  निवडणूक आयोगाकडून होत असलेल्या मत चोरी प्रकरणाचा निषेध म्हणून गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाभरात स्वाक्षरी अभियान राबवून मतचोरी प्रकरणाचा निषेध करण्यात येणार आहे. तसेच 14 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7.00 वाजता जिल्हा काँग्रेस कार्यालय गडचिरोली ते इंदिरा गांधी चौक गडचिरोली पर्यंत कॅण्डल मार्च काढून मत चोरी प्रकरणाचा निषेध जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात येणार आहे. या आंदोलनात व स्वाक्षरी अभियानात जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते सह लोकशाहीवर विश्वास ठेवणारे युवक महिला शेतकरी व्यापारी सह नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे व लोकशाही टिकवण्यासाठी आपला योगदान द्यावा असे आवाहन गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments