भाजप महिला आघाडी गडचिरोली शहराची महत्वपूर्ण बैठक संपन्न

भाजप महिला आघाडी  गडचिरोली शहराची  महत्वपूर्ण बैठक संपन्न


गडचिरोली :
        भारतीय जनता पार्टी महिला आघाडी गडचिरोली शहराची महत्त्वपूर्ण बैठक आज दिनांक 10 मार्च रोजी दुपारी 3 वाजता शासकीय विश्रामगृहात महिला आघाडीच्या जिल्हा प्रभारी तथा माजी नगराध्यक्ष योगिताताई पिपरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

      या बैठकीला भाजपच्या ज्येष्ठ नेत्या प्रतिभाताई चौधरी, महिला आघाडीच्या जिल्हा महामंत्री वर्षा  शेडमाके, जिल्हा परिषदेच्या माजी समाज कल्याण सभापती रंजीताताई कोडाप, गडचिरोली च्या तालुकाध्यक्ष अर्चनाताई बोरकुटे, माजी नगरसेविका लता लाटकर माजी नगरसेविका वैष्णवी नैताम, शहर महामंत्री रश्मी बाणमारे शहर उपाध्यक्ष कोमल बारसागडे महिला आघाडी आदिवासी मोर्चाच्या शहराध्यक्ष भावना कुलसंगे ओबीसी मोर्चाच्या शहराध्यक्ष अर्चनाताई निंबोड शहर सचिव ज्योती बागडे नीताताई बैस उपस्थित होत्या.

    भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या वतीने  जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून दि. 12 मार्च 2023 रोजी  गडचिरोली येथे भाजपचा महिला मेळावा व आपल्या स्वकर्तृत्वाने  व मेहनतीने अहोरात्र परिश्रम घेऊन कुटुंबाचे पालनपोषण करणाऱ्या व आपल्या मुलांना उच्च शिक्षण देणाऱ्या अशा कर्तबगार महिलांचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे या कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीत कार्यक्रमाचे नियोजन करून गडचिरोली शहरातील कर्तबगार महिलांचा शोध घेऊन त्यांना सन्मानित करण्याचे ठरविण्यात आले व त्याची जबाबदारी महिला पदाधिकाऱ्यांना देण्यात आली या बैठकीला भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

Post a Comment

0 Comments