स्व. ऍड. सी डब्लू मुनघाटे यांच्या फोटोचा अनावरण कार्यक्रम संपन्न

स्व. ऍड. सी डब्लू मुनघाटे यांच्या फोटोचा अनावरण कार्यक्रम संपन्न


गडचिरोली,
      दि.गडचिरोली नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्व. ऍड. सी डब्ल्यू मुनघाटे यांच्या फोटोचा अनावरण सोहळा पतसंस्थेच्या सभागृहात मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला.
     या फोटो अनावरण सोहळ्याचे अध्यक्ष दि गडचिरोली नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष अनिल पाटील म्हशाखेत्री होते. तर प्रमुख अतिथी म्हणून पतसंस्थेच्या उपाध्यक्ष श्रीमती सुमतीताई मुनघाटे, मानद सचिव सुलोचनाताई वाघरे, ज्येष्ठ संचालक प्रा. मधुकर कोटगले, पी. टी.पूडके उपस्थित होते.
    यावेळी मान्यवरांच्या हस्ते स्व. ऍड. सी डब्ल्यू मुनघाटे यांच्या फोटोला दिपप्रज्वलन, हारअर्पण व पूजा करून करून फोटोचे अनावरण करण्यात आले.
     या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरून बोलताना अनिल पाटील म्हशा खेत्री म्हणाले की,  दि गडचिरोली नागरी सहकारी पतसंस्थेचे इवलेसे रोपटे संस्थापक अध्यक्ष स्व. ऍड. सी डब्ल्यू मुनघाटे आणि संस्थापक मानद सचिव स्व. प्राचार्य खुशालराव वाघरे यांनी गडचिरोलीत लावले आणि  त्याचे आज वटवृक्षामध्ये रुपांतर झाले आहे. आज जिल्ह्यातील विविध तालुक्यात या पतसंस्थेच्या 9 शाखा सुरू असून जिल्ह्यातील गरजूंना आर्थिक मदत पुरवीत आहे.
      स्व. ऍड. सी डब्ल्यू मुनघाटे
 हे अत्यंत हुशार, मनमिळावू , आणि सर्वांना घेऊन चालणारे होते. या पतसंस्थेच्या प्रगतीत त्यांचा मोलाचा वाटा असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
    कार्यक्रमाचे प्रास्ताविक तथा संचालन प्रा. शेषराव येलेकर यांनी केले, तर आभार  ज्येष्ठ संचालक पी.टी.पुडके यांनी मानले. कार्यक्रमाला पतसंस्थेचे संचालक डि.के. उरकुडे, दिलीप खेवले, किशोर मडावी, मुकुंद मशाखेत्री, पांडुरंग चिलबुले, व्यवस्थापक लिंगाजी मोरांडे, शाखा व्यवस्थापक भूषण रोहनकर, उमेश पालकर, विजय नवघडे,  ताराचंद  वाघरे, प्रमोद ठाकरे, भूमेश मंगर, मंगेश तिवाडे, कमलेश भोयर, राजू डोईजड, शुभम खेडकर तसेच विविध शाखांचे शाखा व्यवस्थापक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments