आदिवासी वन मजूरांवरील गुन्हे मागे घ्या



आमदार धर्मराव बाबा आत्राम यांची मागणी 


गडचिरोली,
 बहुचर्चित कमलापुर परिक्षेत्रातील कोरपल्ली ते आशा या रस्त्याचे काम मंजूर असल्याचे सांगूण कंत्राटदाराने आदिवासी वन मजरांकडून काम करवून घेतले. मात्र केंद्र शासनाची अंतिम  मंजूरी अपात्र असल्याने ८४ आदिवासी बांधवांवर गत नोव्हेबर महिन्यात अवैध वृक्षतोडिचे गुन्हा दाखल झाले. मात्र कंत्राटदारावर गुन्हा दाखल  न करता आदिवासी वन मजूरांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याने आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी  आक्रमक भूमिका घेतली असून नुकतेच नागपुर येथे  पार पडलेल्या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित करून विधानसभेत आवाज उचलले.
    कमलापूर वनपरिक्षत्रातील कोरपल्ली- आशा रस्ता कामासाठी संबधीत कंत्राटदाराने आदिवासी बांधवांकडून काम करवून घेतले गेले असतांना सिरोंचा वनविभागाने संबंधित कंत्राटदारावर कारवाई न करता मोलमजुरी करणाऱ्या 84 आदिवासी वन मजुरांवर वनगुन्हे दाखल करण्यात आले होते. वनाधिकारीच्या या तुघलकी कारवाईवर ताशेरे ओढीत वनमजुरांच्या न्यायासाठी आदिवासींवरील सदर खोटे गुन्हे मागे घेऊन खोटी कार्यवाही करणाऱ्या संबंधित वन अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार  यांनी आमदार धर्मरावबाबा आत्राम यांचेकडे निवेदनातून केली होती. तसेच यासंदर्भात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची मुंबई येथे प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांनाही याकडे लक्ष केंद्रित करीत न्यायचे साकडे त्यांनी घातले होते. नुकताच नागपूर येथे पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी तारांकित प्रश्न उपस्थित करीत वनविभागाने कंत्राटदाराला अभय देऊन भोळ्या-भाबळ्या आदिवासी वन मजूरांवर  गुन्हे दाखल केल्याने संताप व्यक्त केला. आदिवासी बांधवांवरील दाखल गुन्हे अन्यायकारक बाब असून असले प्रकरण खपवून घेणार नसल्याचा ईशारा त्यांनी दिला. तसेच तात्काळ वन मजूरांवर गोवन्यात आलेले वनगुन्हे मागे घेण्याची मागणी आ.धर्मराव बाबा आत्राम यांनी केली.

Post a Comment

0 Comments