गरिबांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविणे हीच माँ साहेबांची शिकवण


 गडचिरोली जिल्हा शिवसेना सहसंपर्क प्रमुख अरविंद
कात्रटवार यांचे प्रतिपादन
 
गडचिरोली,
 माँ साहेब मिनाताई ठाकरे यांच्या जयंती निमित्य गडचिरोली तालुक्यातील मौशीखांब-मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रातील शेकडो माता भगिनींना वस्त्रभेट.
 महाराष्ट्राच्या जडणघडणीत आदरणीय ठाकरे कुटुंब आणि शिवसेना यांचे महत्वपुर्ण योगदान आहे. आदरणीय ठाकरे परिवार म्हणजे मराठी माणसाप्रती असलेली आत्मीयता, प्रेमभाव आणि समाजकार्याची भावना अधोरेखीत होते. शिवसेना घडवण्यात माँ साहेबांनी वेळोवेळी केलेल्या मदतीचे अनेक संदर्भ आपल्याला पहायला मिळतात. माँसाहेब या शिवसैनिकांची सावली आणि सर्वांसाठी माऊली समान होत्या. त्या वात्सल्समुर्ती व प्रेमाचा झरा होता, त्याच्या कार्याची प्रेरणा घेऊन आपल्या हातून जनसेवेचे कार्य सुरू आहे, असे प्रतिपादन शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांनी केले. 

 माँसाहेब मिनाताई ठाकरे यांच्या जयंती निमित्य शिवसेना सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवर यांच्या वतीने गडचिरोली तालुक्यातील मौशीखांब - मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रातील चांभार्डा  येथे शेकडो माता भगिनींना वस्त्रभेट देण्यात आली. या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. 

 माता भगिंनींना संबोधीत करतांना शिवसेना सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार पुढे म्हणाले की, हिंदु हदयसम्राट मा. बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श जोपासून शिवसेना निर्माण केली. आम्ही मा. बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत. मा. बाळासाहेब व माँसाहेब ठाकरे यांनी शिवसैनिकांना जनसेवेची शिकवण दिली. प्रत्येक शिवसैनिक हा शिवसेनेच्या कुटुंबातील सदस्य माणून माँसाहेब ठाकरे यांनी सेवाभाव जोपासला. शिवसेनेने सदैव सेवाभाव जोपासून राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्व दिले आहे. कोणतीही समस्या निर्माण झाल्यास न्याय मिळवून देण्यासाठी सर्वप्रथम शिवसेना पुढे येते. जनतेच्या समस्या लक्षात घेऊन शिवसेनेच्या वतीने गडचिरोली तालुक्यातील मौशीखांब-मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रातील अनेक समस्या आंदोलनाच्या माध्यमातून तथा प्रशासनाकडे पाठपुरावा करून सोडवून या भागातील विकासाला गती देण्याचा प्रयत्न केला आहे. मी एक शिवसैनिक म्हणून जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर असून कोणतीही समस्या असल्यास माझ्यापर्यंत पोहचवा, ती सोडविण्यासाठी नेहमीच कटीबध्द राहीन, अशी ग्वाही शिवसेना सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांनी वस्त्रभेट कार्यक्रमाप्रसंगी माता- भगिनींना दिली. 

 शिवसेना सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार हे जनतेच्या हाकेला धावून जाणारे खरे खुरे शिवसैनिक आहेत. मकरसंक्रांती या पवित्र सणाच्या पावनपर्वावर गोर-गरीब महिलांना वस्त्रभेट करुन सामाजिक बांधीलकीचे दर्शन घडविले आहे. त्यांच्या हातून जनसेवेचे कार्य असेच घडत राहावे आणि जनता नेहमीच त्यांच्या पाठीशी राहील असे गौरोद्गार माताभगिनींनी याप्रसंगी काढले .
 याप्रसंगी शिवसेना उपतालुका प्रमुख यादवजी लोहंबरे, विभाग प्रमुख संदिप आलबनकर, सरपंच सुरज ऊईके, विभाग प्रमुख अमित बानबले, नवनाथ ऊके, संजय बोबाटे, दिपक लाडे, स्वप्निल खांडरे, अंबदास मुनघाटे, त्र्यंबक फुलझेले, प्रशांत ठाकुर, निरंजन लोहंबरे, सुनिल रंधये, निलकंठ चुधरी, भाऊराव नन्नावरे, रत्नाकर रंधये, संदिप टेंभुणे, उमाजी चनेकार, वसंत आभारे, रमेश सिडाम, देविदास चनेकार, मयुर भोयर, महेश लाजुरकर, अंकुश झाडे, पंकज चनेकार, खुशाल मेश्राम, प्रांजल कोलते, पराग कुमरे, उमाजी लाजुरकर, पुरुषोत्तम चनेकार, दुर्वेश मुनघाटे, सुभाष देशमुख, रुपेश आजबले, भाऊराव मुनघाटे, गुरुदेव गोहणे, कृणाल पेंदाम आदि शिवसैनिक व नागरिक तसेच माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Post a Comment

0 Comments