ठाकुरदेव यात्रेच्या समारोपप्रसंगी सुरजागड लोह खदानी विरोधात एल्गार!




बनावट जनसूनावणी विरोधात न्यायालयात जाणार : भाई रामदास जराते 
गडचिरोली,
एट्टापल्ली गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या सुरजागड येथील ठाकुरदेव यात्रेच्या समारोपप्रसंगी उपस्थितांनी सुरजागड लोह खदानीच्या विरोधात रस्त्यावरचा संघर्षात सोबतच न्यायालयीन लढाई लढण्याचा निर्धार जाहीर केला. 

समारोप सभेच्या अध्यक्षस्थानी सुरजागड पारंपारिक इलाखा प्रमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य सैनू गोटा, शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई रामदास जराते, काॅग्रेस नेते माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मनोहर पोरेट्टी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव माजी जिल्हा परिषद सदस्य काॅमरेड अमोल मारकवार, नगरसेवक मनोहर बोरकर, शिलाताई गोटा, जयश्री वेळदा, तितिक्षा डोईजड, मंगेश नरोटे, चुंडूजी दोरपेट्टी, मंगेश होळी प्रामुख्याने उपस्थित होते.

रोजगाराच्या नावाने अनुसूचित क्षेत्रातील संसाधनांची लुट करणाऱ्या भांडवलदारांना मदत करणाऱ्या दलालांना आणि सरकारला हाकलून लावण्याचे आवाहन शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई रामदास जराते यांनी केले.

आदिवासींच्या संस्कृतीची जोपासना करण्यासाठी शिकलेल्या तरुणांनी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन काॅग्रेस नेते माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांनी केले.  

सुरजागड खदानीचा संघर्ष आम्ही शस्त्र घेऊन नव्हे तर भारताचे संविधान आणि कायदे घेऊन करत असल्याने घाबरलेल्या सरकारने आंदोवकांवर वेळोवेळी खोटे गुन्हे दाखल करुन दडपशाही चालविली असल्याचा आरोप मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव काॅ अमोल मारकवार यांनी केला.

आदिवासी जनतेने निवडून दिलेले आमदार, खासदारच सुरजागड लोह खदानीच्या बाजूने जावून कंपनीची दलाली करत असल्याने संपत्तीची लूट सुरू आहे. जनतेची बाजू घेऊन लढणाऱ्या आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना कंपनी आणि सरकार नाहक बदनाम करण्याचा प्रयत्न करत असून पिढ्यानपिढ्या जोपासल्या गेलेल्या आमच्या संकृती आणि संसाधनांसाठी आम्ही शेवटपर्यंत संघर्ष करत राहणार असल्याचा निर्धार सुरजागड पारंपारिक इलाखा प्रमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य सैनू गोटा यांनी व्यक्त केला.

Post a Comment

0 Comments