जननायक बिरसा मुंडा "सामाजिक न्याय महामेळाव्याचे भव्य आयोजन
रेगडी हळदवाही जिल्हा परिषद क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी व तळागाळातील सर्वसामान्य गोरगरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी कटीबद्ध!.. - डॉ. प्रणय भाऊ खुणे प्रदेशाध्यक्ष राष्ट्रीय मानवाधिकार संघटना.
मौजा पूसगुडा तालुका चामोर्शी येथे उद्या दिनांक 9 नोव्हेंबर 2025
चामोर्शी / घोट
रेगडी हळदवाही जिल्हा परिषद क्षेत्रातील मौजा पूसगडा येथे राष्ट्रीय मानवाधिकार संघटना ( असो) दिल्ली जिल्हा गडचिरोली तालुका शाखा घोट च्या वतीने "जननायक बिरसा मुंडा" सामाजिक न्याय महामेळावाचे उद्या दिनांक 9 नोव्हेंबर 2025 रोज रविवारला सकाळी 11:00 वाजता आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमात राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रणय भाऊ खुणे
यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजन करण्यात आलेले आहे. यानिमित्ताने या भागातील सर्वसामान्य गोरगरीब शोषित वंचित आदिवासी बंधू भगिनी यांच्या समस्या ऐकून घेणार आहेत तसेच या कार्यक्रमात "सामाजिक न्याय "व" पेसा "कायदा "मानवी हक्क" व "मानवी मूलभूत अधिकार "या विषयावर प्रमुख वक्ते मार्गदर्शन करणार आहेत व येथे नागरिकांच्या वतीने मांडण्यात आलेल्या सर्व समस्यांचा पाठपुरावा राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या वतीने राज्य व राष्ट्रीय पातळीवर करण्यात येणार आहे व प्रामुख्याने या कार्यक्रमात सर्व आजी,माजी, सरपंच,उपसरपंच, इलाकाप्रमुख, पोलीस पाटील, भूमीया,पुजारी प्रतिष्ठित गणमान्य नागरिक यांचा सत्कार करण्यात येणार आहे तसेच राष्ट्रीय मानव अधिकार संघटणेत नवीन सदस्यांचा प्रवेश सोहळा होणार आहे तरी समस्त चामोर्शी तालुका राष्ट्रीय मानवाधिकार संघटना पदाधिकारी कार्यकर्ते तसेच मौजा पूसगुडा भागातील सर्व नागरिक पदाधिकारी कार्यकर्ते तसेच रेगडी हळदवाही जिल्हा परिषद भागातील नागरिक पदाधिकारी कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रीय मानवाधिकार संघटना तालुका चामोर्शी शाखा घोटच्या वतीने व समस्त पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या वतीने करण्यात आलेले आहे.

0 Comments