गडचिरोली, आरमोरी, वडसा नगर परिषदेसाठी काँग्रेसकडे 137 इच्छुक उमेदवारांचे अर्ज
गडचिरोली :
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने रणशिंग फुंकले असून, गडचिरोली, आरमोरी व वडसा नगरपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसकडून उमेदवारी मिळविण्यास इच्छुक उमेदवारांचे अर्ज 3 ते 5 नोव्हेंबर या कालावधीत मागविण्यात आले होते. दरम्यान, गडचिरोली नगरपरिषदेसाठी नगराध्यक्ष पदासाठी 2 आणि नगरसेवक पदासाठी 37, आरमोरीसाठी नगराध्यक्ष पदासाठी 3 व नगरसेवक पदासाठी 50, तसेच वडसा नगरपरिषदेसाठी नगराध्यक्ष
पदासाठी 3 आणि नगरसेवक पदासाठी 42 असे एकूण 137 अर्ज प्राप्त झाले. या सर्व इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती जिल्हा काँग्रेस कार्यालय, गडचिरोली येथे जिल्हा निवड मंडळाच्या वतीने घेण्यात आल्या. या वेळी जिल्हा निवड मंडळात जिल्हा निरीक्षक सचिन नाईक, आमदार रामदास मसाराम, गडचिरोली विधानसभा निरीक्षक संदेश सिंगलकर, अहेरी विधानसभा निरीक्षक संतोष रावत, गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, प्रदेश महासचिव पंकज गुड्डेवार, प्रदेश महासचिव रवींद्र दरेकर, प्रदेश महासचिव तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष
अजय कंकडलावार, माजी जि.प. उपाध्यक्ष मनोहर पा. पोरेटी, प्रदेश महासचिव हनुमंतू मडावी, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष ऍड. कविता मोहरकर, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष नितेश राठोड, सेवादल जिल्हाध्यक्ष राजू गारोदे, अल्पसंख्यांक सेल अध्यक्ष आरिफ कनोजे, आरमोरी तालुकाध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, गडचिरोली तालुकाध्यक्ष वसंत राऊत, वडसा तालुकाध्यक्ष राजेंद्र बुल्ले, तसेच NSUI जिल्हाध्यक्ष निशांत वनमाळी उपस्थित होते. या वेळी जिल्हा निवड मंडळातील इतर पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने इच्छुक उमेदवारांची उपस्थिती होती.

0 Comments