महर्षी वाल्मीक रुषी यांची प्रेरणा समाजाने घ्यावी. माजी उपसभापती विलास केशवराव दशमुखे यांचे आवाहन

महर्षी वाल्मीक रुषी यांची प्रेरणा समाजाने घ्यावी. 
 माजी उपसभापती विलास केशवराव दशमुखे यांचे आवाहन
पोरला येथे महर्षी वाल्मीक ऋषी यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी
गडचिरोली.
     महर्षी वाल्मिक ऋषी यांची प्रेरणा घेऊन समाजाचा विकास करावा असे आवाहन माजी उपसभापती विलास केशवराव दशमुखे यांनी केले महर्षी वाल्मिक ऋषी यांनी केलेले कार्य  सवाॅना माहिती असुन त्यांच्या कार्याचा प्रसार व प्रचार करुन समाज प्रबोधन करणे आवश्यक आहे असे मत सुध्दा त्यांनी व्यक्त केले. त्याचबरोबर पोरला येथे प्रथमच ढीवर, भोई, केवट समाज‌ एक वाटून हा कार्यक्रम घडवून आणला त्याबद्दल सर्व आयोजन करणणार्याचे त्यांनी अभिनंदन केले. तसेच येणाऱ्या काळात महर्षी वाल्मिक ऋषी यांची मूर्ती स्थापनेसाठी आपण सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. या अगोदर समाज मंदिराचे आश्वासन देऊन आपण पूर्ण केले असून माजी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या निधीमधून सदर समाज मंदिर निर्माण करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
        कायॅकमाला माजी विस्तार अधिकारी उखंडाराव राऊत, भाजपा तालुका अध्यक्ष दत्तूजी सूत्रपवार, तालुका महामंत्री रमेश नैताम,  पोरला तंटामुक्तीचे अध्यक्ष गोपाल गेडाम, दुधराम सहारे, चंदुजी गेडाम, श्रीधर भोयर, शालीक भोयर, तुळशीदास दाणे, पांडूजी भोयर, बंटी उपासे, श्रीमती कुसुमताई उपासे आदी मान्यवर उपस्थित होते. 
    यावेळी महर्षी वाल्मिक ऋषी यांच्या प्रतिमेला मला दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
   कार्यक्रमाचे प्रास्ताविक रामचंद्रजी राऊत यांनी केले संचालन व आभार प्रदर्शन शालीक भोयर यांनी मानले. 
   कार्यक्रमाला मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते

Post a Comment

0 Comments